टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्मा याच्या घरी त्याची बहिण कोमलच्या लग्नाची तयारी सूरू आहे. त्याचं अख्खं कुटुंब या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत.या दरम्यान भारताच्या विजयावर बोलताना अभिषेकची आई म्हणाली की, घर आधीच उत्सवांनी भरलेले होते,त्यात आता अभिषेक आणि भारतीय संघाने विजय मिळवून त्यांच्या आयुष्यात आणखी आनंद भरला असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
दरम्यान भारताच्या या विजयानंतर कोलम शर्मा हिने न्यूज 18 इंडियाशी बातचित केली आहे. यावेळी बोलताना कोमल म्हणाली की, अभिषेकने मला विचारले की मला लग्नाची कोणती भेट हवी आहे आणि मी म्हणाले की आशिया कपची ट्रॉफी आपल्या घरी आणं. आणि अभिषेकने हे वचन पूर्ण केले आहे, असे कोमल सांगते. कोमल पुढे म्हणाली, मला माझ्या भावाचे सर्व सामने पाहायला आवडते आणि त्याच्या लग्नानंतरही मी त्याच्या सर्व सामने पाहत राहीन.
मी आणि माझी आई शेवटच्या सामन्यासाठी दुबईत होतो, पण यावेळी आम्ही तिथे जाऊ शकलो नाही याबद्दल मी थोडी निराश आहे.आमच्या संपूर्ण संघाने संपूर्ण देशाला एक उत्तम भेट दिली,असे तिने सांगितले. भारताने पाकिस्तानकडून घेतलेल्या बदलाबद्दल विचारले असता ती म्हणाली,आम्ही पाकिस्तानला हरवले आणि ट्रॉफी घरी आणली आणि त्यांना यापेक्षा जास्त उत्तरांची गरज नाही.
अभिषेकच्या आईने सांगितले की, जेव्हा जेव्हा मुलगा मोठी कामगिरी करतो तेव्हा ती आईसाठी खूप आनंदाची गोष्ट असते, पण त्याची मेहनत पाहून मी आधीच भाकित केले होते की तो नक्कीच काहीतरी मोठे साध्य करेल. एकीकडे, घरी लग्न असते आणि दुसरीकडे, विजयाचे आनंद आणि अभिनंदन असते. बाबाजींनी आपल्याला एकाच वेळी दोन मोठ्या आनंदाने आशीर्वाद दिला आहे,असे त्या म्हणतात.
अभिषेक शर्माची कामगिरी
अभिषेक शर्माने सात सामन्यांमध्ये 314 धावा करून टी20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले. या काळात त्याने तीन अर्धशतके झळकावली आणि त्याचा सर्वोच्च धावसंख्या 75 होती.त्याने 44.85 च्या सरासरीने आणि 200च्या स्ट्राईक रेटने धावा करत, बहुतेक सामन्यांमध्ये भारताला चांगली सुरुवात करून दिली होती.