TRENDING:

Adithya Ashok : हातावर रजनीकांतचा टॅटू, हृदयात न्यूझीलंड, गिलची विकेट घेणारा 'थलायवा'चा फॅन!

Last Updated:

पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडकडून लेग स्पिनर आदित्य अशोक खेळला. या सामन्यात आदित्य अशोकने टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची विकेटही घेतली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बडोदा : रविवारी बडोद्यामध्ये भारताविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडकडून भारतीय वंशाचा लेग स्पिनर आदित्य अशोक खेळला. या सामन्यात आदित्य अशोकने टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची विकेटही घेतली. तामीळनाडूच्या वेल्लोरमध्ये जन्मलेला अशोक वयाच्या 4 वर्षांपर्यंत भारतात राहिला. पण त्यानंतर आदित्यचे पालक चांगल्या करिअरच्या संधींसाठी न्यूझीलंडच्या ऑकलंडला गेले.
हातावर रजनीकांतचा टॅटू, हृदयात न्यूझीलंड, गिलची विकेट घेणारा 'थलायवा'चा फॅन!
हातावर रजनीकांतचा टॅटू, हृदयात न्यूझीलंड, गिलची विकेट घेणारा 'थलायवा'चा फॅन!
advertisement

कुटुंबासह आदित्यही न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाला. तिथेच त्याने क्रिकेट खेळायला सुरूवात केली. 2020 च्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये आदित्य न्यूझीलंडकडून खेळला. यानंतर डिसेंबर 2021 मध्ये त्याने ऑकलंडसाठी प्रोफेशनल टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पुढच्या काही दिवसांमध्येच उत्कृष्ट कामगिरी करून अशोक त्यांचा सगळ्या फॉरमॅटचा नियमित खेळाडू बनला. 2022-23 हा त्याचा यशस्वी मोसम ठरला, त्यामुळे त्याला न्यूझीलंडचा वर्षातील सर्वोत्तम युवा खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आलं.

advertisement

स्थानिक क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर आदित्य अशोकची न्यूझीलंडच्या आंतरराष्ट्रीय टीममध्ये निवड झाली. युएईच्या दौऱ्यात आदित्य अशोक टी-20 खेळला. यानंतर काही महिन्यांनी त्याने बांगलादेशविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पण पाठीच्या दुखापतीमुळे त्याला बराच काळ टीमबाहेर राहावं लागलं. आतापर्यंत आदित्य अशोकने 4 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याला 3 विकेट मिळाल्या आहेत.

advertisement

रजनीकांतचा फॅन आहे अशोक

आदित अशोक हा रजनीकांत याचा फॅन आहे. आदित्य अशोकच्या हातावर रजनीकांतच्या चित्रपटाच्या डायलॉगचा टॅटूही आहे. रजनीकांतच्या पदयप्पा या चित्रपटातील 'एन वाझी थानी वाझी' हा डायलॉग आदित्य अशोकच्या हातावर आहे. आदित्यने त्याच्या दिवंगत आजोबांसोबत रजनीकांतचा पाहिलेला हा शेवटचा चित्रपट होता.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: डाळिंबानं मार्केट खाल्लं, रविवारी शेवगा आणि गुळाला किती मिळाला दर?
सर्व पहा

भारताच्या दौऱ्याआधी आदित्य अशोकने 2025 साली चेन्नई सुपर किंग्जच्या अकादमीमध्ये बरेच आठवडे प्रशिक्षणही घेतलं होतं.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Adithya Ashok : हातावर रजनीकांतचा टॅटू, हृदयात न्यूझीलंड, गिलची विकेट घेणारा 'थलायवा'चा फॅन!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल