दुबई: आशिया कपमध्ये भारताकडून 5 विकेटनी पराभव झाल्यानंतर देखील पाकिस्तान संघाचा माज आणि मस्ती उतरली नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरची पाश्वभूमी असलेल्या या स्पर्धेत भारताने पाकिस्तान खेळाडूंशी हॅडशेक केला नव्हता. त्यावरून पाकिस्तानचे खेळाडू आणि पीसीबी यांनी बरीच आदळाआपट केली होती. भारताविरूद्धच्या सामन्यात गन सेलीब्रेशन आणि विमान पाडल्याची अॅक्शन करण्याचा बालिशपणा पाकिस्तानी खेळाडूंनी केली होती.
advertisement
स्पर्धेत भारताने पाकिस्तान संघाचा एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल ३ वेळा पराभव केला. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर टीम इंडियाने आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून पुरस्कार घेण्यास ठाण नकार दिला. यामुळे पुरस्कार सोहळा सुरू होण्यास उशीर झाला. अखेर पुरस्कार सोहळा सुरू झाला तेव्हा आधी अंपायर आणि नंतर पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंना उपविजेतेपदाचे मेडल देण्यात आले. अखेरीस कर्णधार सलमान आघा याला मेडल दिले तसेच उपविजेतेपदाची रक्कम 1.3 कोटी रुपयांचा चेक देण्यात आला. त्यानंतर समालोचक सायमन डूल यांनी चार शब्द बोलण्यासाठी बोलवले असता आघाने हा चेक कोणाकडे तरी देण्या ऐवजी व्यासपीठावरून फेकून दिला.
Salman agha gadiki ekkado kalinattu vundi lucha gadu🤣🤣🤣 #INDvPAK pic.twitter.com/GkEn7deKZj
—