बॅटिंगच्या दृष्टिकोनातून दुर्दैवी
मार्करामने बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये टीमच्या सुरुवातीच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. तो म्हणाला, बॉलने आणि फिल्डमध्ये काही चांगली चिन्हे दिसली. आम्ही जशी सुरुवात करायची ठरवली होती, तशी केली. त्यामुळे आम्ही गर्व करू शकतो. पण बॅटिंगच्या दृष्टिकोनातून हे दुर्दैवी होते, असं म्हणत मार्करमने टीम इंडियाच्या बॉलर्सला पराभवाचं कारण ठरवलं आहे. T20 च्या फॉरमॅटमध्ये असे कधीकधी घडते असं मार्करमने स्पष्ट केले. पहिल्याच मॅचमध्ये हे घडले याचे त्याला वाईट वाटलं, पण तो म्हणाला की, आता या गोष्टीवर पडदा टाकायला हवा.
advertisement
10-15 धावा कमी करता आल्या असत्या
विकेटच्या परिस्थितीबद्दल बोलताना तो म्हणाला की, पिच थोडी 'स्टिकी' होती. टेनिस बॉलसारखा बाऊन्स आणि इनिंग्जमध्ये थोडीशी बॉलची गती होती. मार्करामच्या मते, 175 धावांचे लक्ष्य त्यांनी स्वीकारले असते आणि त्याचा पाठलाग करण्याचा विश्वास टीमला होता. तो म्हणाला की, 10-15 धावा कमी करता आल्या असत्या, असे बारीक विचार नेहमी करता येतात, पण त्यांना फक्त बॅटसोबत उत्तम खेळण्याची गरज होती, जी यावेळी झाली नाही.
सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं
टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये जास्त विचार करायला वेळ नसतो, असे सांगत मार्करामने पार्टनरशिप न बांधता येणे हे पराभवाचे सर्वात मोठे कारण असल्याचे सांगितले. विकेट गमावल्यानंतर स्थिर न राहणे आणि मोमेंटम आपल्या बाजूने आणता न येणे यावर त्याने लक्ष वेधले. आम्ही उद्या थोडी चर्चा करू. अशा गोष्टींमध्ये जास्त अवघडून पडण्याची गरज नाही. यावर पडदा टाकून या फॉरमॅटच्या सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचे आहे, असंही मार्करम म्हणालाय.
