TRENDING:

Ajinkya Rahane : मुंबईचा राजा अजिंक्य रहाणे! व्हिडिओ शेअर करत म्हणाला, कठीण काळात उभं राहूया...

Last Updated:

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर अजिंक्य रहाणेने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने कठीण काळात शेतकऱ्यांसोबत उभं राहण्याचं आवाहन चाहत्यांना केलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ajinkya rahane
ajinkya rahane
advertisement

Ajinkya Rahane on Farmer : मुंबईचा राजा रोहित शर्मा, मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा घोषणा तुम्ही अनेकदा रोहित शर्माच्या फॅन्सना देताना पाहिल्या असतील. पण मुंबईचा खरा राजा आहे अजिंक्य रहाणे. तुम्हाला प्रश्न पडला असेल असं का तर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर अजिंक्य रहाणेने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने कठीण काळात शेतकऱ्यांसोबत उभं राहण्याचं आवाहन चाहत्यांना केलं आहे. तो असं आवाहन नेमकं का करतो आहे? हे जाणून घेऊयात.

advertisement

अजिंक्य रहाणे इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नमस्कार,मी अजिंक्य रहाणे, आज मी थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहे.पण तो विषय आपल्या सगळ्यांसाठी फार महत्वाचा आहे.म्हणजेच शेतकरी...गेले अनेक दिवस महाराष्ट्रात आणि राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिपाऊस झालेला आहे. त्या पाऊसामुळे शेतकऱ्यांचं बरचस नुकसान झालं आहे आणि होत आहे.हे आपण सगळ्यांनी वाचलं असेल आणि ऐकलं देखील असेल. मी स्वत:एका शेतकरी कुटुंबातून असल्या कारणाने, मला जाणीव आहे की अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना किती त्रास होतो.

advertisement

वर्षानुवर्ष शेतकरी शेतात मेहनत करत असतो. आणि जे काय आपल्या ताटात असतं आणि आपल्याला जेवायला मिळतं ते फक्त शेतकऱ्याच्या मेहनतीमुळे. सरकार आपल्यापरीने मदत करतेच आहे.पण मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहावे. आपल्याकडून जी काय मदत करता येईल ती करा. माझ्यापरीने मी नक्कीच मदत करतो. पण मला हेच सांगायचं आहे, आपल्याकडून जी होईल ती मदत करा

advertisement

शेतकऱ्याला आपल्या सगळ्यांची गरज आहे. शेतकरी आपल्या पाठीचा कणा आहे.त्यामुळे तुमच्याकडून जी कोणती मदत होईल ती करा आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहा, असे आवाहन अजिंक्य रहाणे चाहत्यांना केलं आहे.

मराठवाड्याला पावसाचा सर्वात मोठा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसात मराठवाड्यात पावसाने तर कहरच केला आहे. यावर्षी पावसामुळे मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात महापुराचा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास उद्ध्वस्थ झाला आहे. कित्येकांची घरं मोडली आहे, कोसळली आहेत. सोबत जनावरे देखील वाहून गेली आहेत. त्यामुळे बळी राजा हवालदिल झाला आहे. अशातच आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक जण मदतीचा हात पुढे करत आहेत. दरम्यान भारतीय स्टार क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे देखील समोर आला आहे. त्याने शेतकरी आपला कणा असून त्याच्यासाठी उभ राहण्याच आवाहन रहाणेकडून करण्यात आले आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ajinkya Rahane : मुंबईचा राजा अजिंक्य रहाणे! व्हिडिओ शेअर करत म्हणाला, कठीण काळात उभं राहूया...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल