सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी वेस्ट झोनच्या टीममध्ये स्थान मिळवण्यासाठीची स्पर्धा तीव्र होती. 'आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. रहाणे पुजाराला टीममध्ये स्थान मिळवणे सोपे नव्हते. सरफराज आणि श्रेयससारखे खेळाडू असल्यामुळे स्पर्धा खूपच कठीण झाली आहे', असं एका निवड समिती सदस्याने सांगितलं आहे.
रहाणेची निराशाजनक रणजी कामगिरी
2023-24 च्या हंगामात मुंबईला 42 व्या रणजी ट्रॉफी जेतेपदापर्यंत नेण्यात रहाणेने कर्णधार म्हणून भूमिका बजावली होती, पण त्याची स्वतःची कामगिरी खूपच निराशाजनक होती. 8 सामन्यांमध्ये तो दोन अर्धशतकांसह 17.83 च्या सरासरीने फक्त 214 रन करू शकला. 2024-25 च्या रणजी हंगामात त्याने 9 सामन्यांमध्ये 35.92 च्या सरासरीने 467 रन केल्या आणि एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले.
advertisement
चेतेश्वर पुजाराने 2024-25 च्या रणजी हंगामात सौराष्ट्रसाठी चांगली कामगिरी केली. त्याने 7 सामन्यांमध्ये 40.20 च्या सरासरीने एकूण 402 रन केल्या, ज्यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश होता, पण त्याची कामगिरी निवड समितीला प्रभावित करू शकली नाही. पुजाराने अलिकडेच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यातील टेस्ट सीरिजमध्ये कॉमेंट्री केली, ज्यावरून पुजारा हळूहळू मैदानापासून दूर जात असल्याचं चित्र आहे.
दुलीप ट्रॉफीसाठी वेस्ट झोनची टीम
शार्दुल ठाकूर (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, आर्य देसाई, हार्विक देसाई, श्रेयस अय्यर, सरफराज खान, ऋतुराज गायकवाड, जयमीत पटेल, मनन हिंगराजिया, सौरभ नवाले, शम्स मुलानी, तनुश कोटियान, धर्मेंद्रसिंह जडेजा, तुषार देशपांडे, अर्जन नगवासवाला