'मुंबईचं नेतृत्व करण्याचा आणि चॅम्पियनशीप जिंकण्याचा अभिमान आहे. नवा हंगाम सुरू होत आहे, त्यामुळे नव्या नेतृत्वाला तयार करण्याची हीच योग्य वेळ आहे, असं मला वाटतं, त्यामुळे मी मुंबईची कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेतला आहेत, पण मी खेळाडू म्हणून मुंबई क्रिकेटला आणखी ट्रॉफी जिंकवण्यासाठी सर्वकाही देईन. येणाऱ्या हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहे', अशी पोस्ट रहाणेने केली आहे.
advertisement
रहाणेच्या फिडबॅकने फिरला गेम!
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबईने 2023-24 साली 7 वर्षांनंतर रणजी ट्रॉफी पटकावली. तसंच 2024/25 ला इराणी ट्रॉफीमध्येही विजय मिळवला होता. दुलीप ट्रॉफीसाठी शार्दुल ठाकूरची वेस्ट झोनचा कर्णधार म्हणून निवड झाल्यानंतर आता त्याला मुंबईच्या टीमचंही नेतृत्व मिळालं आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार मुंबई क्रिकेटच्या निवड समिती सदस्यांनी अजिंक्य रहाणेसोबत पुढच्या कॅप्टनबाबत चर्चा केली आणि त्याचा फीडबॅकही घेतला. अजिंक्य रहाणेने मागच्या रणजी ट्रॉफीच्या हंगामात 14 इनिंगमध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाच्या मदतीने 467 रन केल्या. शार्दुल ठाकूरने मागच्या काही वर्षात मुंबई क्रिकेटच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली. मागच्या मोसमात शार्दुलने एका शतकाच्या मदतीने 505 रन केल्या तसंच 9 सामन्यांमध्ये 35 विकेटही घेतल्या.