सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या ओडिशाने सात बाद 167 रन केल्या. प्रत्युत्तरादाखल, रहाणेच्या खेळीमुळे मुंबईने फक्त 16 ओव्हरमध्ये एक बाद 168 रन करून विजय मिळवला. मुंबईसाठी ही दमदार खेळी अजिंक्य रहाणेचा आत्मविश्वास नक्कीच वाढवेल, कारण तो आगामी आयपीएल हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार आहे.
विदर्भाचा दणदणीत विजय
दुसऱ्या सामन्यात, फास्ट बॉलर यश ठाकूरच्या चार विकेट्सच्या जोरावर विदर्भाने आंध्रचा 19 रननी पराभव केला. ग्रुप अ मधून मुंबईसह पुढील फेरीत आधीच आपले स्थान पक्के करणाऱ्या आंध्रने त्यांचा शेवटचा सामना गमावला. प्रथम बॅटिंग करताना विदर्भाने आठ बाद 154 रन केल्या. प्रत्युत्तरात आंध्रला नऊ विकेट गमावून फक्त 135 रनच करता आल्या. यश ठाकूरने 22 रनमध्ये चार विकेट्स घेतल्या. यश ठाकूरने पहिल्या सामन्यातही 5 विकेट घेतल्या होत्या. स्पर्धेमध्ये त्याने एकूण 18 विकेट घेतल्या आहेत.
advertisement
विदर्भाचा डाव अमन मोखाडे (50) आणि विकेट कीपर अक्षय वाडकर (41) यांच्याभोवती फिरला. आंध्रचा फास्ट बॉलर सत्यनारायण राजूने 26 रनवर चार विकेट्स घेतल्या. आंध्रची बॅटिंग कामगिरी खराब होती, त्यांनी 31 रनमध्ये तीन विकेट गमावल्या. यामध्ये भारतीय खेळाडू श्रीकर भरतचाही समावेश होता, जो रन काढण्यात अपयशी ठरला. पायला अविनाशने 37 बॉलमध्ये 44 रन केल्या, पण विजय निश्चित करण्यासाठी त्या पुरेशा नव्हत्या.
