कोलकत्ताने दिलेल्या 207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वाल आणि वैभव सुर्यवंशी जोडी मैदानात उतरली होती. यावेळी पुन्हा एकदा वैभव सुर्यवंशी आपल्या फलंदाजीची चुणुक दाखवेल अशी अपेक्षा होती. मात्र वैभव अवघ्या 4 धावांवर बाद झाला.
वैभव अरोराने टाकलेल्या बॉलवर सुर्यवंशीने उंचावर बॉल टाकला होता. यावेळी अजिंक्य रहाणेने बाऊंड्री लाईनवर उटला पळत जात भन्नाट झेल घेतला आहे.खरं तर उलटा पळत जाऊन झेल घेण तितकंस सोप्प नसतं. पण अजिंक्य रहाणेने ते चांगल्या प्रकारे करून दाखवलं आणि भन्नाट झेल घेतला. विशेष म्हणजे ही कॅच घेतल्यानंतर अजिंक्य रहाणे अग्रेशन दाखवत भन्नाट सेलीब्रेशन केलं.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन):
यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (कर्णधार), कुणाल सिंग राठोड, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, युद्धवीर सिंग चरक, आकाश मधवाल
कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन) :
रहमानउल्ला गुरबाज (विकेटकिपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), आंगक्रिश रघुवंशी, मोईन अली, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा