ऋषभने कुलदीपचे पाय खेचले
बीसीसीआयने सामन्यानंतर खेळाडूंच्या गप्पांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात फिरकी गोलंदाज कुलदीप यादव, ऋषभ पंत आणि हर्षित राणा यांच्यात गप्पांची मैफील रंगली अन् तिघंही मस्ती करताना दिसत आहेत. त्यावेळी ऋषभ अन् हर्षितने कुलदीपचे पाय खेचले.
advertisement
सर्व डीआरएस तुमच्यासाठी आहेत
माझे डीआरएस नेहमी चुकतात. मला वाटतं की ही विकेट आहे. शांत राहण्यास सांगण्यासाठी तुमच्या आजूबाजूच्या लोकांना हवे असतात. मला वाटतं की संघाला मिळणारा प्रत्येक डीआरएस माझ्यासाठी आहे आणि मला तो स्वीकारावाच लागेल, असं कुलदीप म्हणाला. कुलदीपचं वक्तव्य ऐकून ऋषभने त्याची शाळा घेतली. हा भाऊ, सर्व डीआरएस तुमच्यासाठी आहेत, असं म्हणत कुलदीपला डिवचलं. त्यावर हर्षित राणाने देखील उडी घेतली.
तीन वेळा डीआरएस घेण्यापासून रोखले
दरम्यान, रोहित शर्माने कुलदीप यादवला तीन वेळा डीआरएस घेण्यापासून रोखले. गोलंदाजीच्या फॉलो-थ्रू दरम्यान त्याने त्याला परत जाण्यास सांगितले. विराट कोहलीच्या मदतीने, रोहितने कुलदीपचा पाय ओढण्याची संधी सोडली नाही. रोहितने इशारा केला, तू परत जा... यावर कोहली देखील हसताना दिसला.
