बेटिंगसाठी पाकिस्तानी खेळाडूंचा वापर - अंबादास दानवे
मुंबई पोलिसांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असून यामध्ये मेहुल जैन, कमलेश जैन आणि हिरेन जैन या व्यक्तींचा समावेश आहे. यांच्याकडून पाकिस्तानी खेळाडूंचा यासाठी वापर केला जात आहे. तसेच नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लोटस 24 नावाच्या ऍपच्या माध्यमातून बेटिंग केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. मेहुल जैन, कमलेश जैन आणि हिरेन जैन या सर्व व्यक्ती मुंबईत आयपीएलसाठी आल्या आहेत, असंही अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
advertisement
मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांची दुबईत बैठक
मेहुल जैन, कमलेश जैन आणि हिरेन जैन हे सातत्याने बेटिंग करतात. पाकिस्तान येथील लोकांशी व खेळाडूंशी संपर्क ठेवतात. खुलेआम मुंबईतील मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत पाकिस्तान आणि दुबई येथून येऊन बैठक घेतात. नुकतीच चॅम्पियन ट्रॉफी संपली असून आयपीएलसाठी त्यांचे नियोजन झाले आहे. राज्यात खुलेआम पोलिसांच्या सहकाऱ्यांने बेटिंग सुरू असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी यावेळी केला आहे.