जसप्रीत बुमराह मैदानावर पुन्हा कधी दिसणार याची चाहत्यांना उत्सुकता लागलेली असताना त्याच्याबद्दल बऱ्याच उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. बुमराहचे करिअर संपले, तो पुन्हा मैदानावर दिसणार नाही अशा बातम्या समोर येत आहे. अशा प्रकारच्या बातम्यांमध्ये खरच तथ्य आहे का आणि या चर्चा कशामुळे सुरू झाल्या ते जाणून घेऊयात.
न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा माजी प्रशिक्षक शेन बॉन्डने बुमराहच्या दुखापतीबाबत मोठा दावा केला आहे. बॉन्डने स्पष्ट सांगितले की, जर त्याच ठिकाणी पुन्हा दुखापत झाली, तर त्याचा संपूर्ण क्रिकेट करिअर संपुष्टात येऊ शकतो.
advertisement
शेन बॉन्ड यांचा मोठा इशारा
शेन बॉन्डने सांगितले की, त्यांना आधीच अंदाज होता की बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघात स्थान मिळवू शकणार नाही. बॉन्डने असेही म्हटले आहे की, आयपीएलनंतर लगेच इंग्लंड दौरा होणार आहे, जिथे पाच कसोटी सामने खेळवले जातील. अशा परिस्थितीत वेगवान बदल करणे बुमराहसाठी धोकादायक ठरू शकते.
मुलाखतीत बॉन्ड म्हणाला...
जेव्हा तो स्कॅनसाठी सिडनीला गेला, तेव्हा समजले की त्याला केवळ साधी दुखापत आहे. मात्र, मला शंका होती की, ही साधी दुखापत नसून हाडांशी संबंधित मोठी दुखापत असू शकते. त्यामुळेच मला वाटले की तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकणार नाही.
क्रिकेटपटूवर धर्म बदलण्यासाठीची जबरदस्ती, माजी गोलंदाजाच्या दाव्याने खळबळ
त्याने पुढे असेही सांगितले की, बुमराह ठीक होईल, पण वर्कलोड मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाचे ठरेल. इंग्लंड दौऱ्याच्या वेळी बुमराहला आरामाची संधी कुठे मिळेल, हे पाहणे गरजेचे आहे. कारण आयपीएल संपल्यानंतर लगेच कसोटी क्रिकेटमध्ये जाणे धोकादायक ठरू शकते.
T20 वरून कसोटी खेळणे कठीण
शेन बॉन्डने स्पष्ट केले की, एकदिवसीय सामन्यांमधून कसोटी क्रिकेटमध्ये जाणे सोपे असते, कारण खेळाडूंना सातत्याने 50 षटकांचा सामना करावा लागतो. मात्र, T20 क्रिकेटमधून थेट कसोटीत जाणे अत्यंत कठीण असते.
T20 क्रिकेटमध्ये एका आठवड्यात तीन सामने खेळले जातात, त्यात दोन दिवस प्रवासासाठी जातात. कसोटी सामन्यातील वर्कलोड त्याच्या दुपटीने अधिक असतो. त्यामुळे खेळाडूचे शरीर एवढ्या झपाट्याने बदलाला तयार नसते. त्यांनी असेही सांगितले की, भारतीय संघ जून ते ऑगस्टदरम्यान इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे आणि आयपीएल मे महिन्याच्या अखेरीस संपेल. त्यामुळे बुमराहला कसोटी क्रिकेटसाठी तयार करणे खूप अवघड ठरेल.
शेन बॉन्ड यांचा धक्कादायक दावा
बॉन्ड म्हणाला, जर बुमराहला पुन्हा त्याच जागी दुखापत झाली, तर त्याचे करिअर धोक्यात येऊ शकते. कारण त्या भागावर पुन्हा शस्त्रक्रिया करणे शक्य आहे का, याची खात्री नाही. त्यांच्या मते, भारतीय संघ व्यवस्थापनाने वेगळा विचार करून बुमराहच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घ्यायला हवा. बॉन्डने स्पष्ट केले की, खेळाडू खेळण्यासाठी उतावळा असतो, पण व्यवस्थापनाने त्याला योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.