निखीलचा शेफील्ड शिल्डमध्ये धुमाकूळ
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून निखील चौधरी आहे. तुम्ही याला ओळखत नसाल आणि त्याचं नाव देखील ऐकलं नसेल. निखील शेफील्ड शिल्डमध्ये आपल्या बॅटने धुमाकूळ घालत आहे. दिल्लीत जन्मलेला आणि पंजाबसाठी लिस्ट ए क्रिकेट खेळणारा निखिल चौधरी या शतकात शेफील्ड शिल्डमध्ये शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू बनून इतिहास रचला आहे.
advertisement
2020 मध्ये ऑस्ट्रेलियाला गेला पण...
दिल्लीत जन्मलेला आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व करणारा निखिल चौधरी 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाला गेला आणि कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान तो तिथंच अडकला. तेव्हापासून, तो भारतीय नागरिक असूनही ऑस्ट्रेलियन कायमचा रहिवासी झाला आहे. निखीलने 9 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीने 163 धावांची आक्रमक खेळी केली. स्पिन बॉलिंगपासून सुरूवात केलेल्या निखीलचं आता अर्शदीपने कौतूक केलं आहे.
अर्शदीपची पंजाब किंग्जकडे मागणी
दरम्यान, अर्शदीप सिंगने इन्टाग्रामवर टाकलेल्या एका स्टोरीमध्ये पंजाब किंग्जकडे एक मागणी केली आहे. अर्शदीपने निखिलाच्या इनिंगचा एक फोटो शेअर करत त्याला पंजाब किंग्जमध्ये घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पंजाब किंग्ज आगामी लिलावात निखील चौधरीला संघात सामील करून घेणार का? असा सवाल विचारला जात आहे.
