दुबई: आशिया कप 2025 चा प्रवास आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे आणि क्रिकेटप्रेमी भारत–पाकिस्तानच्या ऐतिहासिक लढतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. रविवारी (28 सप्टेंबर) होणाऱ्या या रोमांचक फायनलमध्ये मैदानावरील थराराबरोबरच मोठे पारितोषिक रक्कम (Prize Money) देखील चर्चेचा विषय ठरली आहे.
advertisement
विजेत्यांसाठी मोठा पुरस्कार
आशिया कप 2025 चे विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला तब्बल 2.6 कोटी रुपये (सुमारे 3 लाख अमेरिकन डॉलर) मिळणार आहेत. ही रक्कम 2022 च्या मागील आवृत्तीपेक्षा तब्बल 50% जास्त आहे. यावरून स्पर्धेचे वाढते आर्थिक यश आणि जागतिक महत्त्व स्पष्ट होते.
उपविजेत्यांसाठी किती?
फायनल हरलेल्या संघालाही मोठे बक्षीस मिळणार आहे. उपविजेत्यांना 1.3 कोटी रुपये (सुमारे 1.5 लाख अमेरिकन डॉलर) दिले जातील. त्यामुळे दोन्ही संघांच्या मेहनतीला आणि समर्पणाला योग्य आर्थिक सन्मान मिळणार आहे.
अन्य पुरस्कार
संघ पुरस्कारांबरोबरच वैयक्तिक कामगिरीसाठी मोठी रक्कम दिली जाणार आहे. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूसाठी ‘प्लेअर ऑफ द सीरिज’ पुरस्कार देण्यात येईल. त्यासाठी 12.5 लाख रुपयांचे रोख बक्षीस निश्चित करण्यात आले आहे. हा पुरस्कार अशा खेळाडूला मिळेल ज्याची कामगिरी सामन्यांचा निकाल बदलून टाकेल आणि प्रेक्षकांचे मन जिंकेल.
या स्पर्धेत भारत हा एकमेव संघ आहे जो आतापर्यंत अपराजित राहिला आहे. भारताने गुप फेरी आणि त्यानंतर झालेल्या सुपर-४ फेरीत सर्व सामने जिंकले आहेत. आता भारताची फायनल आधीची अखेरची लढत श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. मात्र ही लढत एक औपचारिकचा असेल. कारण लंकेचा संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
भारताचा फायनलपर्यंत प्रवास
युएईवर 9 विकेटनी विजय
पाकिस्तानवर 7 विकेटनी विजय
ओमानवर 21 धावांनी विजय
पाकिस्तानवर 6 विकेटनी विजय
बांगलादेशवर 41 धावांनी विजय