टॉस जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादव सलमान आघासोबत काहीही न बोलता रवी शास्त्रींजवळ गेला आणि आपण पहिले बॉलिंग करणार असल्याचं सांगितलं. भारतीय टीममध्ये दोन बदल केल्याचंही सूर्या म्हणाला. हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांच्याऐवजी जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती या दोघांचं भारतीय टीममध्ये कमबॅक झालं आहे. ओमानविरुद्धच्या सामन्यात दोघांनाही विश्रांती देण्यात आली होती.
advertisement
टॉसवेळी रवी शास्त्रींसोबत बोलल्यानंतरही सूर्यकुमार यादवने सलमान आघाकडे पाहिलं नाही आणि तो ड्रेसिंग रूमच्या दिशेने निघून गेला. याआधी ग्रुप स्टेजमध्येही सूर्यकुमार यादवने टॉसवेळी सलमान आघासोबत हस्तांदोलन केलं नव्हतं. तसंच मॅच जिंकल्यानंतरही भारतीय खेळाडू पाकिस्तानी टीमसोबत हस्तांदोलन न करता ड्रेसिंग रूममध्ये गेले, तसंच त्यांनी ड्रेसिंग रूमचा दरवाजाही बंद करून घेतला. ग्रुप स्टेजमध्ये झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 विकेटने पराभव केला होता. मागच्या 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानचा 11 वेळा पराभव केला आहे, त्यामुळे सुपर-4 च्या सामन्यातही भारतीय टीम विजयाची दावेदार मानली जात आहे.
भारताची प्लेयिंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन (विकेट कीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती
पाकिस्तानची प्लेयिंग इलेव्हन
सॅम अयूब, साहिबजादा फरहान, फखर जमान, सलमान आघा, हुसैन तलत, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहिन आफ्रिदी, हारिस राऊफ, अबरार अहमद