घटस्थापनेचे महत्त्व
नवरात्राच्या सुरुवातीला देवीच्या आगमनाचे प्रतीक म्हणून घटस्थापना केली जाते. पवित्र माती, नारळ, कलश आणि सुपारी यांच्या साहाय्याने हा विधी पार पाडला जातो. हा विधी योग्य मुहूर्तावर केल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते, अशी श्रद्धा आहे.
Navratri 2025: शारदीय नवरात्र म्हणजे काय? 9 दिवस उपवास का करतात? पूजा, विधी आणि महत्त्व
advertisement
यावर्षीचे खास मुहूर्त
यावर्षी घटस्थापनेच्या दिवशी राहू काळ असल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे की, नेमकं किती वाजता घटस्थापना करावी. याबाबत आदित्य जोशी गुरुजी यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले की, राहू काळ टाळून घटस्थापनेसाठी काही विशिष्ट मुहूर्त उपलब्ध आहेत.
गुरुजींनी दिलेले चार शुभकाळ पुढीलप्रमाणे:
सकाळी 6.00ते 7.30 – अमृत काल, घटस्थापनेसाठी उत्तम मानला जातो.
सकाळी 9.01 ते 10.32 – शुभकाळ.
दुपारी 1.30 ते 6.00 – घटस्थापनेसाठी योग्य वेळ.
या दिलेल्या चौघड्यांमध्ये घटस्थापना केल्यास विशेष फलप्राप्ती होते. मात्र, राहू काळात किंवा इतर वेळी घटस्थापना टाळावी, कारण त्यातून रोग, उद्वेग आणि अडथळे निर्माण होऊ शकतात.