advertisement

Amavashya: पाडव्याच्या फाल्गुन अमावस्‍येला या 5 गोष्टींचे दान सर्वोत्तम; घरात पितृदोष उरणार नाही, अडचणी दूर

Last Updated:

Amavashya March 2026: फाल्गुन अमावस्या अत्यंत फलदायी मानली जाते. यावर्षी 19 मार्च 2026, गुरुवारी फाल्गुन अमावस्या आहे. ही तिथी पितरांना समर्पित असून या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान, तर्पण, श्राद्ध आणि दानधर्माला मोठे महत्त्व आहे.

News18
News18
मुंबई : हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व दिले जाते, त्यातही फाल्गुन अमावस्या अत्यंत फलदायी मानली जाते. यावर्षी 19 मार्च 2026, गुरुवारी फाल्गुन अमावस्या आहे. ही तिथी पितरांना समर्पित असून या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान, तर्पण, श्राद्ध आणि दानधर्माला मोठे महत्त्व आहे. गरजूंना दान दिल्याने पितृ प्रसन्न होतात आणि कुंडलीतील पितृदोष दूर होतो. काही ठिकाणी फाल्गुन अमावस्येला भूतडी अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय असतात, त्यामुळे निर्जन स्थळी जाणे टाळावे असा सल्ला दिला जातो.
फाल्गुन अमावस्येला करायचे विशेष दान- ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी आणि पितरांच्या आशीर्वादासाठी खालील वस्तूंचे दान करणे उत्तम मानले जाते.
काळ्या तिळाचे दान - अमवास्येला पितृ तर्पणामध्ये काळ्या तिळाचा वापर मुख्यत्वे केला जातो. तसेच काळ्या तिळाचा संबंध शनि ग्रहाशी आहे. या दिवशी काळ्या तिळाचे दान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि शनीची कृपा लाभते.
advertisement
अन्नदान - अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. गरीब आणि गरजू लोकांना भोजन दिल्यास मोठे पुण्य मिळते. पितरांचे श्राद्ध-तर्पण अन्नदानाशिवाय पूर्ण होत नाही, असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी शक्य तितक्या गरजूंना जेवू घालावे.
advertisement
वस्त्रदान - फाल्गुन अमावस्येला गरिबांना कपड्यांचे दान द्यावे. यामुळे पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. शक्य असल्यास या दिवशी काळ्या रंगाच्या वस्त्रांचे दान करणे अधिक फलदायी ठरते.
advertisement
गोदान - हिंदू धर्मात गोदान हे सर्वात श्रेष्ठ मानले जाते. पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी गोदान करायचे असेल तर फाल्गुन अमावस्येचा दिवस अतिशय शुभ आहे. यामुळे कळत-नकळत झालेल्या पापांतून मुक्ती मिळते आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते.
दीपदान - नदी, तलाव किंवा जलाशयाच्या काठी संध्याकाळी दीपदान करण्याची परंपरा आहे. फाल्गुन अमावस्येला दीपदान नक्की करावे. या दिवशी घराच्या दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा लावावा. दक्षिण ही पितरांची दिशा मानली जाते, त्यामुळे दिवा लावल्याने त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळतात.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Amavashya: पाडव्याच्या फाल्गुन अमावस्‍येला या 5 गोष्टींचे दान सर्वोत्तम; घरात पितृदोष उरणार नाही, अडचणी दूर
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement