या सामन्यात भारताचा विजय झाला असला, तरी बॉलिंग आणि फिल्डिंगने कर्णधार सूर्यकुमार यादवचं टेन्शन वाढलं आहे. या सामन्यात पाकिस्तानने पहिल्या 10 ओव्हरमध्येच 90 रनचा टप्पा गाठला होता, यात भारताच्या फिल्डिंगनेही पाकिस्तानला मदत केली. तसंच टीम इंडियाचं ट्रम्प कार्ड असलेला जसप्रीत बुमराहही या सामन्यात अपयशी ठरला. बुमराहने 4 ओव्हरमध्ये तब्बल 45 रन दिले.
advertisement
चार भारतीय खेळाडूंना मेल
या सामन्याच्या पहिल्याच ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला अभिषेक शर्माने साहिबजादा फरहानचा कॅच सोडला, यानंतर फरहानने अर्धशतक केलं. यानंतर मॅचच्या पाचव्या ओव्हरमध्ये वरुण चक्रवर्तीच्या बॉलिंगवर कुलदीप यादवने सॅम अयुबला जीवनदान दिलं. पुढे अभिषेक शर्माने साहिबजादा फरहानचा बाऊंड्री लाईनवर आणखी एक कॅच सोडला. 19 व्या ओव्हरमध्ये शुभमन गिलच्या हातातून फहीम अश्रफचा कॅच सुटला. पाकिस्तानची बॅटिंग सुरू असताना शेवटच्या बॉलला फहीम अश्रफने मोठा शॉट मारला, पण शिवम दुबे बाऊंड्री लाईनपासून बराच पुढे उभा होता. दुबे बाऊंड्री लाईनवर उभा असता तर त्याला हा कॅच अगदी सहज पकडता आला असता, पण दुबेच्या चुकीमुळे पाकिस्तानला 6 रन जास्त मिळाल्या.
या सामन्यात टीम इंडियाने सोडलेल्या या कॅचबद्दल कर्णधार सूर्यकुमार यादव यानेही नाराजी व्यक्त केली. पहिल्या इनिंगनंतर टीम इंडियाचे फिल्डिंग कोच टी दिलीप यांनी ज्या खेळाडूंनी कॅच सोडले आहेत, त्यांना मेल केल्याचं सूर्यकुमार यादव मॅच संपल्यानंतर म्हणाला आहे.