आशिया कपमध्ये विकेट कीपर म्हणून केएल राहुल आणि ऋषभ पंत यांची निवड व्हायची शक्यता कमी आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यातील टेस्ट सीरिजमध्ये राहुल आणि पंत यांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती, पण टी-20 फॉरमॅटमध्ये या दोघांनाही वगळलं जाणार असल्याचं बोललं जातंय. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये पंतच्या पायाला दुखापत झाली होती, त्यामुळे तो फिट नाहीये. तर केएल राहुल मागच्या बऱ्याच काळापासून भारताकडून टी-20 क्रिकेट खेळलेला नाही.
advertisement
संजू सॅमसन पहिली पसंत
स्पोर्ट्स स्टारने दिलेल्या वृत्तानुसार संजू सॅमसन हा आशिया कपसाठी विकेट कीपर म्हणून पहिली पसंती असेल, तर जितेश शर्मा याची बॅकअप विकेट कीपर म्हणून निवड केली जाईल. आयपीएल 2025 मध्ये जितेश शर्माने धमाकेदार कामगिरी केली होती. आरसीबीला आयपीएल ट्रॉफी जिंकवण्यातही जितेश शर्माने महत्त्वाची भूमिका बजावली. जितेश शर्माने भारताकडून 9 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले, यात त्याने 100 रन केल्या आहेत. 14 जानेवारी 2024 ला जितेश शर्मा अफगाणिस्तानविरुद्ध शेवटची टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळला होता.
दुसरीकडे 33 वर्षांचा केएल राहुल हा वनडे क्रिकेटमध्ये विकेट कीपर म्हणून पहिली पसंत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला जिंकवण्यातही केएल राहुलचा महत्त्वाचा वाटा होता, पण केएल राहुल टीम इंडियाच्या टी-20 प्लानमधून बाहेर आहे. केएल राहुल हा टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये भारताकडून 2 हजार रन करणाऱ्या 4 खेळाडूंपैकी एक आहे. केएल राहुलने शेवटची आंतरराष्ट्रीय टी-20 मॅच 10 नोव्हेंबर 2022 ला इंग्लंडविरुद्ध ऍडलेडमध्ये खेळली होती.