ग्रुप ए बद्दल बोलायचं झालं तर भारत 2 सामन्यात चार गुणांसह +4.793 च्या रनरेटने पहिल्या स्थानी आहे.त्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानी पाकिस्तान आहे.पाकिस्तानचे 3 सामन्यात 4 गुणांसह +1.790 च्या रनरेटने दुसऱ्या स्थानी आहे. ग्रुप ए मधील हे दोन्हीही संघ सुपर 4 मध्ये पोहोचले आहेत.
आता ग्रुप बी बद्दल बोलायचं झालं तर अद्याप एकही संघ सुपर 4 मध्ये पोहोचला नाही आहे. श्रीलंका 2 सामन्यात 4 गुणांसह आणि 1.546 रनरेटने पहिल्या स्थानी आहे. तर बांग्लादेश 3 सामन्यात 4 गुणांसह -0.270 रनरेटसह दुसऱ्या स्थानी आहे. तर तिसऱ्या स्थानी अफगाणिस्तान आहे. अफगाणिस्तानचे 2 सामन्यात 2 गुण आहेत. तर रनरेट +2.150 आहे. जो बांग्लादेशपेक्षा खूप चांगला आहे.
advertisement
आज आशिया कपमध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना पार पडणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ सुपर 4 मध्ये पोहोचणार आहे. आता जर अफगाणिस्तान जिंकलं तर तो सुपर 4 मध्ये पोहोचणार आहे. कारण त्यांचा रनरेट बांग्लादेशपेक्षा चांगला आहे. आणि श्रीलंका पराभूत होऊन देखील सुपर 4 मध्ये पोहोचेल.आणि जर अफगाणिस्तानचा पराभव झाला तर बांग्लादेशच्या क्वालिफाय होण्याची शक्यता वाढतील.
दरम्यान आशिया कपमधून सध्या ओमान आणि युएई हे संघ बाहेर झाले आहेत. तर ग्रुप बी मधून हॉगकॉंग हा संघ बाहेर झाला आहे.जर ओमान स्पर्धेतून बाहेर झाली असली तर तिला उद्या शुक्रवारी भारताविरूद्ध औपचारीकता सामना खेळावा लागणार आहे. या सामन्याचा निकालाचा फारसा फरक पडणार नाही आहे.
भारत पाकिस्तान पु्न्हा भिडणार
आशिया कपमध्ये पाकिस्तानने युएईचा पराभव करून सुपर-4 मध्ये प्रवेश केला आहे. ग्रुप ए मधून सुपर-4 मध्ये प्रवेश करणारी पाकिस्तान भारतानंतरची दुसरी टीम ठरली आहे. ग्रुप ए मधील सुपर-4 चे चित्र स्पष्ट झाल्यामुळे आता पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातल्या या सामन्याची तारीखही समोर आली आहे. रविवार 21 सप्टेंबरला पुन्हा एकदा दुबईमध्येच दोन्ही टीमची मॅच होईल.