खरं तर सूपरमध्ये ग्रुप ए मधून भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ पोहोचले आहेत. तर ग्रुप बी मधून श्रीलंका आणि बांग्लादेश हे दोन संघ आहेत.अशाप्रकारे हे चार संघ आता सुपर 4 मध्ये आपआपसात लढणार आहे. या सामन्यांना 20 सप्टेंबरपासून सूरूवात होणार आहे.
पाकिस्तानचा माज उतरणार!अंतिम फेरीत पोहोचण्याआधीच हार पक्की? वाचा समीकरण
advertisement
आता सूपर 4च्या लढती पाहता टीम इंडियाचा पहिला सामना हा 21 सप्टेंबरला रंगणार आहे. हा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरूद्ध असणार आहे. याआधी साखळी फेरीत टीम इंडियाने पाकिस्तानला हरवलं आहे.त्यामुळे टीम इंडिया पाकिस्तानला सहज हरवेल असे वाटते आहे. पण पाकिस्तान विरूद्ध अतिआत्मविश्वास ठेवणे टीम इंडियाला महागात पडू शकते. कारण या सामन्यात जर अतिआत्मविश्वास टीम इंडियाला मैदानाच उतरली आणि पाकिस्तानने टीम इंडियाला हरवलं तर ते सुर्याला खूप महागात पडणार आहे.
आता भारताला हे कसं महागात पडेल हे आम्ही सांगतो. सुपर 4 मध्ये भारताचा दुसरा सामना हा 24 सप्टेंबरला असणार आहे. या सामन्यात टीम इंडियाला बांग्लादेश विरूद्ध खेळावे लागणार आहे. या सामन्यात टीम इंडियाच पारडं जड वाटतंय, त्यामुळे भारत बांग्लादेशचा पराभव करू शकेल,अशी नक्कीच शक्यता आहे.या विजयाने टीम इंडियाला दिलासा मिळेल,पण खरं आव्हान तिसऱ्या सामन्यात आहे.
सुपर 4 मध्ये टीम इंडिया तीन सामने खेळणार, कधी,केव्हा,कुणासोबत लढणार? वाचा एका क्लिकवर
टीम इंडियाचा सुपर 4 मध्ये तिसरा सामना हा 26 सप्टेंबरला आहे. या सामन्यात टीम इंडियाला ग्रूप बीमध्ये टॉपला असलेल्या श्रीलंकेशी होणार आहे.या सामन्यात दोन्ही संघांमध्ये तगडी फाईट होणार आहे.त्यामुळे जर या सामन्यात श्रीलंकेने भारताचा पराभव केला.तर टीम इंडियाचं काही खरं नाही.कारण पाकिस्तानसोबत हार आणि श्रीलंकेसमोर पराभर अशा दोन निकालांमुळे टीम इंडियाचं आशिया कपमधलं आव्हान संपूष्ठात येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सूपर 4 मध्ये सुर्यकुमार यादवला कुणालाही हलक्यात घेण्याचा प्रयत्नही केला नाही पाहिजे. जर भारताने हलक्यात घेतलं आणि घात झाला तर आशिया कपला मुकावं लागणार आहे.त्यामुळे टीम इंडियाला काही करून ही चूक टाळावी लागणार आहे.
अंतिम सामना
सुपर 4 मध्ये जे दोन संघ पॉईट्स टेबलला टॉपला राहतील त्या संघांमध्ये अंतिम सामना पार पडणार आहे. सध्या तरी अंतिम सामन्यात पोहोचण्यास श्रीलंका आणि टीम इंडिया दावेदार मानली जात आहे.
सुपर-4 आणि अंतिम सामना
20 सप्टेंबर – श्रीलंका(बी1) विरुद्ध बांग्लादेश (बी2)
21 सप्टेंबर – भारत (ए1) विरुद्ध पाकिस्तान (ए2)
23 सप्टेंबर – पाकिस्तान (ए2) विरुद्ध श्रीलंका(बी1)
24 सप्टेंबर – भारत (ए1) विरुद्ध बांग्लादेश (बी2)
25 सप्टेंबर – पाकिस्तान (ए2) विरुद्ध बांग्लादेश (बी2)
26 सप्टेंबर – भारत (ए1) विरुद्ध श्रीलंका(बी1)
28 सप्टेंबर – सुपर 4 मधील टॉपचे दोन संघ अंतिम सामन्यात भिडणार आहेत.