ओमानविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर भारताने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 188 रन केल्या. भारताकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 56 रन केले, तर अभिषेक शर्माने 253.33 च्या स्ट्राईक रेटने 15 बॉलमध्ये 38 रनची वादळी खेळी केली. अभिषेक शर्माच्या इनिंगमध्ये 5 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. याशिवाय अक्षर पटेलने 13 बॉलमध्ये 26 आणि तिलक वर्माने 18 बॉल 29 रन केले. ओमानकडून शाह फैजल, जितेन रामानंदी आणि आमीर कलीम यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या.
advertisement
टीम इंडिया सुपर-4 मध्ये
टीम इंडियाने आधीच आशिया कपच्या सुपर-4 मध्ये धडक मारली आहे, त्यामुळे ओमानविरुद्धचा हा सामना टीम इंडियासाठी सराव म्हणून पाहिला जात आहे. सुपर-4 मध्ये टीम इंडियाला पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध खेळायचं आहे. सुपर-4 मध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सामना 21 सप्टेंबरला, बांगलादेशविरुद्ध 24 सप्टेंबरला आणि श्रीलंकेविरुद्ध 26 सप्टेंबरला होणार आहे. सुपर-4 मध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या 2 टीम 28 सप्टेंबरला आशिया कपच्या फायनलमध्ये खेळतील.