भारतीय टीम याआधीच आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे, त्यामुळे या सामन्यात टीम इंडियाला चुका सुधारण्याची संधी आहे. याआधी सुपर-4 च्या पाकिस्तान आणि बांगलादेशिविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या फिल्डरनी मोठ्या प्रमाणावर कॅच सोडले, तसंच अभिषेक शर्मा वगळता इतर बॅटरना मोठा स्कोअर करता आला नाही. टीम इंडियाला हा संघर्ष करावा लागला असला, तरीही त्यांनी आतापर्यंत आशिया कपमधील सगळे सामने जिंकले आहेत. रविवारी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या फायनलआधी भारतीय बॅटरना फॉर्ममध्ये यायचं आणि फिल्डरना फिल्डिंग सुधारण्याचं आव्हान असेल. दुसरीकडे श्रीलंकेचं आशिया कपमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. सुपर-4 मध्ये श्रीलंकेने बांगलादेश आणि पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करला, त्यामुळे श्रीलंका आशिया कपच्या फायनलला पोहोचू शकत नाही.
advertisement
भारताची प्लेयिंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, हर्षीत राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती
श्रीलंकेची प्लेयिंग इलेव्हन
पथुम निसांका, कुसाल मेंडिस, कुसल परेरा, चरिथ असलंका, जनिथ लियानागे, कामिंदु मेंडिस, दासुन शनाका, वानिंदु हसरंगा, दुष्मंता चमीरा, महीश तीक्षणा, नुवान तुषारा