ऋषी कात्यायण यांच्या घरी देवी प्रकट झाल्याने तिला कात्यायनी हे नाव प्राप्त झाले आहे. दुर्गा सप्तशतीमध्ये कात्यायनी देवीला महिषासुरमर्दिनी म्हणून संबोधले गेले आहे. चतुर्भुज स्वरूप धारण केलेल्या या देवीच्या एका हातात खड्ग, दुसऱ्या हातात कमळ असून, उर्वरित दोन हात अभय मुद्रा आणि वर मुद्रा धारण केलेले आहेत. तिचे स्वरूप दयाळूपणाचे प्रतीक मानले जाते.
advertisement
वाहनधारकांना दिलासा! सीनाची पाणीपातळी कमी, 48 तासानंतर सोलापूर- विजयपूर महामार्ग अखेर सुरू, Video
कात्यायनी देवीच्या पूजनात गंगाजल, नारळ, कलश, तांदूळ, लाल वस्त्र, धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. विशेष म्हणजे देवीला मध अत्यंत प्रिय असल्यामुळे पूजेत मधाचा नैवेद्य अर्पण करावा अशी मान्यता आहे. तसेच मालपुआही देवीच्या नैवेद्यात महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी देवीला जाई, जुई, जास्वंद या फुलांच्या माळा अर्पण कराव्या.
धार्मिक मान्यतेनुसार कात्यायनी देवीच्या उपासनेने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, शत्रुनाश होतो आणि आयुष्यात सुख-समृद्धी प्राप्त होते. तसेच पूजनानंतर संबंधित मंत्रांचा जप केल्यास अधिक लाभ मिळतो, असे धर्मग्रंथात सांगितले आहे.