वाहनधारकांना दिलासा! सीनाची पाणीपातळी कमी, 48 तासानंतर सोलापूर- विजयपूर महामार्ग अखेर सुरू, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
सोलापूर - विजयपूर महामार्गावरील दोन्ही बाजूला नदीचं पाणी आल्याने हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पाण्याची पातळी कमी झाल्याने 48 तासानंतर सोलापूर विजयपूर महामार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.
सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यातील सीना नदी अतिवृष्टीमुळे दुतळी भरून वाहत होती. सीना नदीतून 2 लाख क्युसेक्सपेक्षा जास्त पाणी वाहत असल्याने सोलापूर - विजयपूर महामार्गावरील दोन्ही बाजूला नदीचं पाणी आल्याने हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पाण्याची पातळी कमी झाल्याने 48 तासानंतर सोलापूर विजयपूर महामार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.
सोलापूर - विजयपूर महामार्ग संपूर्ण पाण्याखाली गेला होता. सीना नदीच्या पाण्याची पातळी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत हा महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. शुक्रवारी दुपारनंतर पाण्याची पातळी कमी झाल्याने तब्बल 48 तासानंतर सोलापूर - विजयपूर महामार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. सध्या सोलापूर विजयपूर महामार्ग सुरू झाला असून एकेरी मार्गाने वाहतूक सुरू आहे. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत.
advertisement
कोळेगाव येथील धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने सीना नदीची पाण्याची पातळी वाढली होती. त्यामुळे पोलिसांनी बॅरिकेट्स लावून हा महामार्ग बंद केला होता. शुक्रवारी पाच वाजल्यापासून सोलापूर विजयपूर महामार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. दोन दिवस सोलापूर - विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक थांबून असल्याने वाहतूक सुरू होताच वाहतुकीची कोंडी झाली असून या महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. वाहनधारकांनी आपली वाहने सावकाश चालवावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
September 26, 2025 6:21 PM IST
मराठी बातम्या/सोलापूर/
वाहनधारकांना दिलासा! सीनाची पाणीपातळी कमी, 48 तासानंतर सोलापूर- विजयपूर महामार्ग अखेर सुरू, Video