3 आठवड्यांत बॉलिवूडने गमावले 10 तेजस्वी तारे, कोणाला नियतीने हरवलं तर कोणी स्वत:हून आयुष्य संपवलं

Last Updated:
Bollywood Lost 10 Stars : गेल्या तीन आठवड्यांत बॉलिवूडमधील 10 पेक्षा जास्त कलाकारांनी या जगाला निरोप दिला आहे. असरानीपासून ते सतीश शाहपर्यंत सर्वांनी आपल्या कामातून एक अमर वारसा मागे सोडला आहे. गेल्या तीन आठवड्यात अनेक नामवंत कलाकारांचे निधन झाले.
1/10
 पंकज धीर (Pankaj Dheer) : 'महाभारत' या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून कर्णच्या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचलेले पंकज धीर. त्यांचा दमदार आवाज आणि संवादफेक प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवून गेला. त्यांनी सोल्जर, जमीन आणि सनम बेवफा सारख्या चित्रपटांतही उल्लेखनीय भूमिका साकारल्या. 15 ऑक्टोबर रोजी त्यांचे निधन झाले, ज्यामुळे चित्रपटसृष्टीला मोठी हानी झाली.

advertisement
2/10
 मधुमती (Madhumati) : 15 ऑक्टोबर रोजी मधुमतीच्या निधनाने चित्रपटसृष्टीने आपल्या सुवर्णकाळातील एक प्रतीक गमावले. मधुमती या हेलेनपेक्षा उत्कृष्ट नृत्यांगना मानल्या जात होत्या. त्यांनी अक्षय कुमारला त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात प्रशिक्षण दिले होते.

3/10
 असरानी (Asrani) : शोले मधील प्रसिद्ध जेलर कोण विसरेल? असरानी यांनी आपल्या अनोख्या विनोदी अंदाजाने बॉलिवूडला नवी दिशा दिली. दशकानुदशके त्यांनी लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले आणि सिद्ध केले की हसवणे हे देखील एक कला आहे. 20 ऑक्टोबर रोजी त्यांचे निधन झाले.

4/10
 ऋषभ टंडन (Rishabh Tandon) : 21 ऑक्टोबर रोजी ऋषभ टंडन यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला. ऋषभ टीव्ही आणि ओटीटी विश्वात वेगाने आपली ओळख निर्माण करत होता. त्याचं करिअर नुकतंच सुरू झालं होतं आणि नियतीने त्यांना हिरावून नेले.

5/10
 पीयूष पांडे (Piyush Pandey) : 24 ऑक्टोबर रोजी पीयूष पांडे यांच्या निधनाने जाहिरातजगत शोकमग्न झाले. 'हर घर कुछ कहता है' आणि 'चलो आज कुछ अच्छा करते हैं' हे प्रसिद्ध घोषवाक्य त्यांच्या कल्पनेतून आले होते. त्यांनी भारतीय जाहिरात उद्योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली.

6/10
 सतीश शाह (Satish Shah) : साराभाई वर्सेस साराभाई या टीव्ही शो पासून ते चित्रपटांपर्यंत, सतीश शाह यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांची मने जिंकली. त्यांची टाइमिंग आणि साधेपणा यामुळे ते प्रत्येक पिढीचे आवडते अभिनेते बनले. त्यांचे 25 ऑक्टोबर रोजी निधन झाले.

7/10
 सचिन चंदवाडे (Sachin Chandwade) : नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय वेब सिरीज जामताडा 2 चे अभिनेते सचिन चंदवाडे यांचे 27 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांनी आत्महत्या केली असल्याचं म्हटलं जातं.

8/10
 सुलक्षणा पंडित (Sulakshana Pandit) : गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांनी 70 आणि 80 च्या दशकात अनेक अविस्मरणीय गाणी गायली आणि अभिनयही केला. त्यांचा आवाज मधुर होता आणि अभिनय भावपूर्ण. 6 नोव्हेंबर रोजी ही गोड आवाज कायमचा थांबला.

9/10
 हरीश राय (Harish Rai) : कन्नड अभिनेता हरीश राय यांचे 6 नोव्हेंबर रोजी थायरॉईड कॅन्सरमुळे निधन झाले. ते गेल्या वर्षभरापासून या आजाराशी झुंज देत होते. 55 वर्षीय हरीश हे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील तेजस्वी तारे होते. त्यांनी कन्नड, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांत प्रभावी भूमिका साकारल्या.

10/10
 झरीन खान (Zareen Khan) : सुझैन खान यांच्या आई झरीन खान यांचेही 7 नोव्हेंबर रोजी 81 व्या वर्षी निधन झाले. त्या दिवंगत अभिनेत्री असून तेरे घर के सामने आणि एक फूल दो माली सारख्या चित्रपटांत त्यांनी काम केले होते.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement