आता मस्त आनंदात राहायचं! १० नोव्हेंबरपासून गजकेसरी योग, या राशींकडे येणार बक्कळ पैसा
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला सर्वाधिक शुभ ग्रहांपैकी एक मानले जाते. गुरू म्हणजे ज्ञान, धर्म, संपत्ती, दान, सद्गुण आणि विवेक यांचा अधिपती ग्रह. ज्याच्या पत्रिकेत गुरू अनुकूल स्थितीत असतो, त्या व्यक्तीच्या आयुष्यात यश, समृद्धी आणि मान-सन्मान वाढतो.
वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला सर्वाधिक शुभ ग्रहांपैकी एक मानले जाते. गुरू म्हणजे ज्ञान, धर्म, संपत्ती, दान, सद्गुण आणि विवेक यांचा अधिपती ग्रह. ज्याच्या पत्रिकेत गुरू अनुकूल स्थितीत असतो, त्या व्यक्तीच्या आयुष्यात यश, समृद्धी आणि मान-सन्मान वाढतो. गुरूच्या चालीनुसार व्यक्तीच्या जीवनात मोठे बदल होतात. आता येत्या १० नोव्हेंबर रोजी गुरू आणि चंद्राचा संयोग होऊन गजकेसरी योग (Gajkesari Yog 2025) तयार होत आहे. हा योग अतिशय शुभ मानला जातो आणि त्याचा फायदा काही विशिष्ट राशींना होणार आहे. या योगामुळे तीन राशींचे भाग्य उजळू शकते आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतात.
advertisement
सध्या देवगुरू गुरू कर्क राशीत भ्रमण करत आहेत आणि ते ५ डिसेंबरपर्यंत या राशीतच राहतील. या काळात गुरू विविध ग्रहांशी संयोग करून अनेक शुभ-अशुभ योग निर्माण करतात. १० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजून २ मिनिटांनी चंद्र कर्क राशीत प्रवेश करेल. त्या क्षणी गुरू आणि चंद्राचा एकत्रित प्रभाव निर्माण होऊन अत्यंत प्रभावी “गजकेसरी योग” तयार होईल. हा योग ज्यांच्या कुंडलीत शुभ स्थानी पडेल, त्यांच्या जीवनात सुख, संपत्ती, मान आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल.
advertisement
मेष - या राशीसाठी गजकेसरी योग अत्यंत लाभदायी ठरू शकतो. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना बढती अथवा वेतनवाढीचा लाभ होईल. आर्थिकदृष्ट्या ही वेळ स्थिरतेची ठरेल. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधानाचे वातावरण राहील. अचानक अडकलेली कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ यशदायी ठरू शकतो.
advertisement
कर्क - या राशीतच गजकेसरी योग तयार होत असल्यामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी ही वेळ विशेष शुभ आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आकर्षकता आणि आत्मविश्वास वाढेल. निर्णयक्षमता सुधारेल आणि करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित नफा मिळू शकतो. घरगुती वातावरण प्रसन्न राहील आणि आरोग्य सुधारेल. तसेच मानसिक स्थैर्य वाढल्यामुळे नवीन योजनांवर काम सुरू करण्यासाठी हा योग्य काळ ठरेल.
advertisement
कन्या - कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा योग भाग्यवर्धक ठरण्याची शक्यता आहे. व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल आणि मोठे करार किंवा डील्स होऊ शकतात. आर्थिक दृष्ट्या प्रगती होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. या काळात समाजात प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी वाढण्याची शक्यता आहे. काहीजणांना परदेश प्रवासाचाही योग निर्माण होऊ शकतो.


