Pune Crime : नोकरीवरून काढून टाकल्याने दीपकने केला आयुष्याचा शेवट, खंडाळ्यात लॉजवर केला अन्...
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune ends life due to Loss job : दीपक यांची पत्नी स्वाती बोबडे यांनी या संदर्भात आंबेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Pune Crime News : पुणे शहरातून अनेक धक्कादायक घडामोडी ऐकायला येत असतात. अशातच आता पुण्यातून एका व्यक्तीने नोकरीवरून काढल्याने टोकाचं पाऊल उचललं. नोकरीवरून काढून टाकल्यामुळे आलेल्या नैराश्यातून एका 50 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरोधात आंबेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपकच्या पत्नीचा धक्कादायक आरोप
दीपक बोबडे (वय 50, रा. दळवीनगर, आंबेगाव बुद्रुक, पुणे) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दीपक यांची पत्नी स्वाती बोबडे यांनी या संदर्भात आंबेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, अजित जाधव आणि रवींद्र राऊत नावाच्या दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दोघांनी दीपकला त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
advertisement
नोकरीवरून काढून टाकलं अन्...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक बोबडे हे एका खासगी कंपनीत कामाला होते. मात्र, आरोपींनी त्यांना त्रास देऊन आणि छळ करून नोकरीवरून काढून टाकले होते. नोकरी गमावल्यामुळे दीपक बोबडे नैराश्यात गेले. याच नैराश्यातून त्यांनी गुरुवारी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील एका लॉजमध्ये जाऊन गळफास लावून आपले जीवन संपवले.
advertisement
लॉजवर जाऊन आत्महत्या का केली?
तक्रारदार स्वाती बोबडे यांनी केलेल्या आरोपानुसार, पतीला त्रास देऊन कामावरून काढून टाकल्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली. आंबेगाव पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. पण लॉजवर जाऊन आत्महत्या का केली? याचा तपास देखील पोलिसांकडून केला जात आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 09, 2025 11:49 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : नोकरीवरून काढून टाकल्याने दीपकने केला आयुष्याचा शेवट, खंडाळ्यात लॉजवर केला अन्...


