नवरात्रीचा सहावा दिवस : मनोकामना होतील पूर्ण, अशी करा कात्यायनी देवीची पूजा Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
शारदीय नवरात्रीचा सहावा दिवस असून उत्सव आता नवरात्र मध्यावर आली आहे. नवरात्रीच्या या दिवशी नवदुर्गेचे सहावे स्वरूप कात्यायनी देवीची पूजा केली जाते.
मुंबई: शारदीय नवरात्रीचा सहावा दिवस असून उत्सव आता नवरात्र मध्यावर आली आहे. ललिता पंचमी संपल्यानंतर सरस्वती पूजनाची तयारी सुरू झाली आहे. नवरात्रीच्या या दिवशी नवदुर्गेचे सहावे स्वरूप कात्यायनी देवीची पूजा केली जाते. सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा विधी तसंच देवीला कोणती माळ अर्पण करावी? तिचे महत्व? याबद्दल आदित्य जोशी गुरुजी यांनी माहिती सांगितली आहे.
ऋषी कात्यायण यांच्या घरी देवी प्रकट झाल्याने तिला कात्यायनी हे नाव प्राप्त झाले आहे. दुर्गा सप्तशतीमध्ये कात्यायनी देवीला महिषासुरमर्दिनी म्हणून संबोधले गेले आहे. चतुर्भुज स्वरूप धारण केलेल्या या देवीच्या एका हातात खड्ग, दुसऱ्या हातात कमळ असून, उर्वरित दोन हात अभय मुद्रा आणि वर मुद्रा धारण केलेले आहेत. तिचे स्वरूप दयाळूपणाचे प्रतीक मानले जाते.
advertisement
कात्यायनी देवीच्या पूजनात गंगाजल, नारळ, कलश, तांदूळ, लाल वस्त्र, धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. विशेष म्हणजे देवीला मध अत्यंत प्रिय असल्यामुळे पूजेत मधाचा नैवेद्य अर्पण करावा अशी मान्यता आहे. तसेच मालपुआही देवीच्या नैवेद्यात महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी देवीला जाई, जुई, जास्वंद या फुलांच्या माळा अर्पण कराव्या.
advertisement
धार्मिक मान्यतेनुसार कात्यायनी देवीच्या उपासनेने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, शत्रुनाश होतो आणि आयुष्यात सुख-समृद्धी प्राप्त होते. तसेच पूजनानंतर संबंधित मंत्रांचा जप केल्यास अधिक लाभ मिळतो, असे धर्मग्रंथात सांगितले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 26, 2025 7:17 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
नवरात्रीचा सहावा दिवस : मनोकामना होतील पूर्ण, अशी करा कात्यायनी देवीची पूजा Video