TRENDING:

Asia Cup : सुपर-4 मध्ये भारतासमोर 'जाएंट किलर', पाकिस्तान नाही तर या टीमपासून सर्वाधिक धोका!

Last Updated:

Asia Cup Super 4 आशिया कपमध्ये शुक्रवारी टीम इंडिया त्यांचा शेवटचा सामना ओमानविरुद्ध खेळणार आहे. भारतीय टीम आधीच सुपर-4 मध्ये क्वालिफाय झाल्यामुळे या सामन्याला फारसं महत्त्व नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दुबई : आशिया कपमध्ये शुक्रवारी टीम इंडिया त्यांचा शेवटचा सामना ओमानविरुद्ध खेळणार आहे. भारतीय टीम आधीच सुपर-4 मध्ये क्वालिफाय झाल्यामुळे या सामन्याला फारसं महत्त्व नाही. गुरूवारी अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातल्या सामन्यानंतर आशिया कपच्या ग्रुप-4 चं चित्र स्पष्ट झालं आहे. ग्रुप ए मधून भारत आणि पाकिस्तान तर ग्रुप बी मधून श्रीलंका आणि बांगलादेश या टीम सुपर-4 मध्ये पोहोचल्या आहेत.
सुपर-4 मध्ये भारतासमोर 'जाएंट किलर', पाकिस्तान नाही तर या टीमपासून सर्वाधिक धोका!
सुपर-4 मध्ये भारतासमोर 'जाएंट किलर', पाकिस्तान नाही तर या टीमपासून सर्वाधिक धोका!
advertisement

सुपर-4 च्या चारही टीम निश्चित झाल्यामुळे आता कोण कोणाविरुद्ध आणि कधी खेळणार, याच्या तारखाही समोर आल्या आहेत. सुपर-4 मध्ये टीम इंडिया पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियाचे हे तीनही सामने दुबईमध्ये होणार आहेत. सुपर-4 मध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या 2 टीम या आशिया कपच्या फायनलमध्ये खेळणार आहेत.

टीम इंडियाचं सुपर-4 चं वेळापत्रक

advertisement

भारत विरुद्ध पाकिस्तान- रविवार, 21 सप्टेंबर- रात्री 8 वाजता, दुबई

भारत विरुद्ध बांगलादेश- बुधवार, 24 सप्टेंबर- रात्री 8 वाजता, दुबई

भारत विरुद्ध श्रीलंका- शुक्रवार, 26 सप्टेंबर- रात्री 8 वाजता, दुबई

आशिया कप फायनल- रविवार 28 सप्टेंबर- रात्री 8 वाजता, दुबई

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup : सुपर-4 मध्ये भारतासमोर 'जाएंट किलर', पाकिस्तान नाही तर या टीमपासून सर्वाधिक धोका!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल