'फायनल मॅच यू परफॉर्म, व्हॉट हॅपनिंग?' असा प्रश्न अर्शदीप सिंगने तिलक वर्माला विचारला. यावर तिलक वर्मानेही मजेशीर उत्तर दिलं. 'लॉट ऑफ हॅपनिंग, विनिंग सेलिब्रेशन ऍन्ड अ लॉट ऑफ हॅपनिंग', असं उत्तर तिलक वर्माने दिलं.
अर्शदीप सिंगने यानंतर हाच प्रश्न कुलदीप यादवला विचारला, पण हा प्रश्न ऐकून तो गोंधळला. 'व्हॉट हॅपनिंग? हॅपनिंग गुड', असं उत्तर कुलदीप यादवने दिलं.
अर्शदीप सिंगने व्हॉट हॅपनिंग हा प्रश्न विचारून नेमका कुणावर निशाणा साधला? असा प्रश्न चाहत्यांना पडला. खरंतर बांगलादेश प्रीमीयर लीगमध्ये एका प्रेझेंटरने परदेशातल्या खेळाडूंना व्हॉट हॅपनिंग म्हणत प्रश्न विचारले. या प्रेझेंटरच्या इंग्रजीवरून त्याला सोशल मीडियावर बरंच ट्रोल गेलं होतं. बांगलादेशच्या या प्रेझेंटरने विचारलेल्या प्रश्नानंतर वेस्ट इंडिजचा खेळाडू आंद्रे रसेलही गोंधळला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
भारत-पाकिस्तान यांच्यातल्या आशिया कप फायनलनंतर अर्शदीप सिंग, हर्षीत राणा आणि जितेश शर्मा यांनी पाकिस्तानचा स्पिनर अबरार अहमदलाही ट्रोल केलं. या तिघांनीही अबरार विकेट मिळाल्यानंतर जसं सेलिब्रेशन करतो त्याची कॉपी केली.
पाकिस्तानविरुद्धच्या आशिया कप फायनलमध्ये टीम इंडियाचा शेवटच्या ओव्हरमध्ये थरारक विजय झाला. पाकिस्तानने दिलेलं 147 रनचं आव्हान भारताने 2 बॉल शिल्लक असताना पार केलं. याआधी ग्रुप स्टेज आणि सुपर-4 च्या सामन्यातही भारताने पाकिस्तानला पराभूत केलं होतं.