TRENDING:

Asia Cup Trophy : ट्रॉफी द्यायला तयार, पण... मोहसिन नक्वीची मस्ती कायम, टीम इंडियासमोर ठेवली अट

Last Updated:

आशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर दुबईच्या मैदानात मोठा ड्रामा पाहायला मिळाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दुबई : आशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर दुबईच्या मैदानात मोठा ड्रामा पाहायला मिळाला. भारतीय टीमने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा प्रमुख मोहसिन नक्वीकडून ट्रॉफी घ्यायला नकार दिला, पण मोहसिन नक्वी त्याच्या हट्टावर कायम राहिला, त्यामुळे भारतीय टीमने ट्रॉफी तसंच विजेतेपदाची मेडल स्वीकारली नाहीत. यानंतर मोहसिन नक्वी आशिया कपची ट्रॉफी घेऊन गेला, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
ट्रॉफी द्यायला तयार, पण... मोहसिन नक्वीची मस्ती कायम, टीम इंडियासमोर ठेवली अट
ट्रॉफी द्यायला तयार, पण... मोहसिन नक्वीची मस्ती कायम, टीम इंडियासमोर ठेवली अट
advertisement

ट्रॉफीवरून संपूर्ण जगासमोर अपमानित झाल्यानंतर आता मोहसिन नक्वीने आशिया कपची ट्रॉफी भारताला द्यायची तयारी दर्शवली आहे, पण यासाठी त्याने भलतीच अट ठेवली आहे. टीम इंडियाला ट्रॉफी देण्यासाठी औपचारिक समारंभ आयोजित करण्याची इच्छा मोहसिन नक्वीने बोलून दाखवली आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार नक्वीने त्याची ही अट आशिया कपच्या आयोजकांना कळवली आहे, पण नक्वीची ही अट मान्य व्हायची शक्यता कमी आहे.

advertisement

मोहसिन नक्वी हा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष आणि पाकिस्तानी राजकारणी आहे. तसंच तो आशियाई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्षही आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान मोहसिन नक्वीने भारताविरोधात गरळ ओकली होती, त्यामुळे भारतीय टीमने त्याच्याकडून ट्रॉफी घ्यायला नकार दिला.

दुबईच्या मैदानात वाद

टीम इंडियाने नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारायला नकार दिल्यानंतर जवळपास तासभर दुबईच्या मैदानात वाद झाला. आशियाई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांसह सूर्यकुमार यादवने चर्चा केली, यानंतर टीम इंडियाने एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष खालिद अल अरौनी आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्याची तयारी दर्शवली, पण नक्वी याने याला विरोध केला, तसंच ट्रॉफी आपल्याकडूनच घ्यावी लागेल, असा हट्ट धरला.

advertisement

टीम इंडियाने मात्र काहीही झालं तरी नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट केलं, त्यानंतर नक्वीने आशिया कपची ट्रॉफी मैदानातून बाहेर नेण्याचे आदेश तिथल्या कर्मचाऱ्यांना दिले. आशिया कपची ट्रॉफी सध्या स्टेडियम जवळच असलेल्या एसीसीच्या मुख्यालयात ठेवण्यात आल्याचं वृत्त आहे. नक्वीने ट्रॉफी दिली नाही, तरी भारताने ट्रॉफीशिवाय मैदानात विजयाचं सेलिब्रेशन केलं.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup Trophy : ट्रॉफी द्यायला तयार, पण... मोहसिन नक्वीची मस्ती कायम, टीम इंडियासमोर ठेवली अट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल