फायनलमध्ये भारतीय पुरुष कबड्डी संघाची सुरुवात चांगली होऊ शकली नव्हती. इराणने जबरदस्त कामगिरी करताना ३-१ अशा फरकाने आघाडी घेतली होती. यानंतर स्कोअर ५-५ असा बरोबरीत झाला. इराणने नंतर सलग गुण मिळवत ९-६ ने आघाडी घेतली. तर भारतानेही जबरदस्त मुसंडी मारली. हाफ टाइमपर्यंत भारताने १७-१३ अशी आघाडी घेतली होती. इराणचा संघ ऑलआऊट झाला होता.
advertisement
भारताने दुसऱ्या हाफमध्येही चांगली सुरुवात करत २०-१६ असा स्कोअर केला. यानंतर २४-१९ इतका झाला. त्यानंतर इराणने आख्रमक खेळ करत भारताला ऑलआऊट करत बरोबरी साधली. पण भारताने पुन्हा जोरदार खेळ करत २८-२५ अशी आघाडी घेतली. मात्र इराणने पिछाडी भरून काढत बरोबरी साधली. यानंतर पॉइंटवरून वाद झाल्याने खेळ जवळपास अर्धा तास थांबला होता.
सामना संपण्यास २ मिनिटे वेळ राहिला होता. त्यावेळी सुरुवातीला भारताला ३ तर इराणला एक गुण दिला गेला. याला इराणने विरोध केला. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. यानंतर भारतीय खेळाडू कोर्टवरच ठाण मांडून बसले तेव्हा खेळ थांबवण्यात आला. पुन्हा भारताच्या बाजूने निर्णय दिला गेला. भारताला तीन गुण दिले गेले. तर पुन्हा इराणने विरोध केला. शेवटी वादानंतर खेळ सुरू झाला आणि भारताने विजय मिळवला.