TRENDING:

21 वर्षीय क्रिकेटरने हिरावला पाकिस्तानचा विजयाचा घास, भारतालाही वर्ल्ड कप फायनलमध्ये हरवलेलं

Last Updated:

बांगलादेशला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी चार धावांची गरज होती. यासिर बाद झाल्यानंतर रकिबुल हसन मैदानात उतरला. त्याने अखेरच्या चेंडूवर लेग साइडला चौकार मारत बांगलादेशला विजय मिळवून दिला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हाँगझोऊ, 07 ऑक्टोबर : एशियन गेम्स २०२३ मध्येही पाकिस्तानच्या संघाला पदक जिंकता आले नाही. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये त्यांना सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानकडून पराभूत व्हावं लागलं. कांस्य पदकासाठी रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला डकवर्थ लुइस नियमाच्या आधारे ६ गडी राखून हरवलं. पावसामुळे सामना ५ षटकांचा खेळवण्यात आला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५ षटकात १ बाद ४८ धावा केल्या होत्या.
News18
News18
advertisement

डकवर्थ लुइस नियमानुसार बांगलादेशसमोर ६५ धावांचे आव्हान होते. २१ वर्षीय रकिबुल हसनने अखेरच्या चेंडूवर चौकार मारत बांगलादेशला विजय मिळवून दिला. रकिबुलने ४ ऑक्टोबरलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आता सुवर्णपदकासाठी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होणार आहे.

अखेरच्या षटकात बांगलादेशला विजयासाठी २० धावा हव्या होत्या. फिरकीपटू सुफियान मुकीमने हे षटक टाकलं. पहिल्या चेंडूवर यासिर अलीने षटकार मारला. तर दुसऱ्या चेंडूवर दोन धावा काढल्या. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा यासिरने षटकार मारला. ३ चेंडूत १४ धावा वसूल केल्यानं अफगाणिस्तानवरचा दबाव कमी झाला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर यासिरने दोन धावा काढल्या. मात्र पाचव्या चेंडूवर तो बाद झाला. यासिरने १६ चेंडूत ३ चौकार आणि दोन षटकारांसह ३४ धावा केल्या. बांगलादेशला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी चार धावांची गरज होती.

advertisement

यासिर बाद झाल्यानंतर रकिबुल हसन मैदानात उतरला. त्याने अखेरच्या चेंडूवर लेग साइडला चौकार मारत बांगलादेशला विजय मिळवून दिला. याआधी रकिबुलने २०२० अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये त्याच्या फलंदाजीची चुणूक दाखवली होती. फायनलमध्ये बांगलादेशने भारताला हरवून विजेतेपद पटकावलं होतं. फायनलमध्ये रकिबुल हसनने जबरदस्त गोलंदाजी केली होती. त्याने १० षटकात २९ धावा दिल्या होत्या. तर भारतीय कर्णधार प्रियम गर्गची विकेट घेतली होती. फलंदाजी करताना ९ धावांवर नाबाद राहिला होता.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
21 वर्षीय क्रिकेटरने हिरावला पाकिस्तानचा विजयाचा घास, भारतालाही वर्ल्ड कप फायनलमध्ये हरवलेलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल