TRENDING:

Asian Games मध्ये भारताचा विक्रम, मराठमोळ्या अविनाशने घडवला 'गोल्डन' इतिहास

Last Updated:

आशियाई खेळांच्या आठव्या दिवशी स्टीपलचेसमध्ये मराठमोळ्या अविनाश साबळेने भारताचं नाव उंचावलं आहे. अविनाश साबळेला स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक मिळालं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 1 ऑक्टोबर : आशियाई खेळांच्या आठव्या दिवशी स्टीपलचेसमध्ये मराठमोळ्या अविनाश साबळेने भारताचं नाव उंचावलं आहे. अविनाश साबळेला स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक मिळालं आहे. 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारा अविनाश पहिला भारतीय पुरुष ठरला आहे. 29 वर्षांच्या अविनाश साबळेने ऍथलिटिक्स स्पर्धेत भारताला पहिलं सुवर्णपदक जिंकवून दिलं. अविनाशने 8 : 19 . 50 सेकंदांमध्ये रेस पूर्ण केली. अविनाश साबळे हा महाराष्ट्राच्या बीडचा आहे.
बीडच्या अविनाश साबळेला आशियाई स्पर्धेत गोल्ड मेडल
बीडच्या अविनाश साबळेला आशियाई स्पर्धेत गोल्ड मेडल
advertisement

दुसरीकडे एथलिट तजिंदरपाल सिंगने पुरुषांच्या शॉटपुट स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल जिंकलं. तेजिंदरच्या या पदकासह भारताच्या गोल्ड मेडलची संख्या 13 वर तर एकूण पदकांची संख्या 45 झाली.

आशियाई खेळाच्या आठव्या दिवशी रविवारी भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सकाळी शुटिंगमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळालं, यानंतर संध्याकाळी स्टीपलचेसमध्ये अविनाश साबळेनंही सुवर्ण कामगिरी केली. तर भारतीय ट्रॅप निशाणेबाजांनीही शेवटचा दिवस ऐतिहासिक बनवला. पुरुषांच्या टीमला सुवर्ण तर महिला टीमला सिल्व्हर मेडल मिळालं. शेवटच्या दिवशी ट्रॅपमध्ये मिळालेल्या तीन पदकांनंतर भारतीय निशाणेबाजांच्या खात्यात 7 सुवर्ण, 9 सिल्व्हर आणि 6 कांस्य पदकांसह 22 पदकं झाली आहेत. भारतीय निशाणेबाजांची आशियाई खेळातली ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

advertisement

पुरुष टीममध्ये शूटर पृथ्वीराज तोडइमान, काइनन चेनाई आणि जोरावर सिंह सिंधू या भारतीय त्रिकुटाने क्वालिफिकेशनमध्ये आशियाई खेळांच्या रेकॉर्डसह सुवर्ण पदक जिंकलं. भारतीय टीमने क्वालिफिकेशनमध्ये 361 पॉईंट्स मिळवले. खालिद अलमुदहाफ, तलाल अलरशीदी आणि अब्दुलरहमान अलफइहान या कुवेतच्या टीमने 359 पॉईंट्ससह सिल्व्हर मेडल पटकावलं. तर युहाओ गुओ, यिंक की आणि युहाओ वैंग या चीनच्या टीमला 354 पॉईंट्ससह कांस्य पदक मिळालं.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asian Games मध्ये भारताचा विक्रम, मराठमोळ्या अविनाशने घडवला 'गोल्डन' इतिहास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल