नीरज चोप्राने पहिल्यांदा भाला फेकला तो तांत्रिक कारणामुळे रेकॉर्ड केला जाऊ शकला नाही. कॉमेंटेटरच्या मते नीरजचा पहिला थ्रो जवळपास ८७ मीटर गेला होता. त्यानंतर पुन्हा फेकलेला भाला ८२.३८ मीटरवर पडला. नीरजने दुसऱ्या प्रयत्न ८४.४९ मीटर इतका नोंदवला गेला. तिसरा प्रयत्न बाद ठरला तर चौथ्या प्रयत्नात ८८.८८ मीटर थ्रो गेला. त्यानंतरच्या प्रयत्नात ८०.८० मीटर थ्रो फेकला. नीरजचा पाचवा प्रयत्नही फाउल होता.
advertisement
भारताच्या किशोर जेनाने रौप्य पदक पटकावलं. किशोरने पहिला थ्रो ८१.२६ मीटर अंतरावर फेकला. तर दुसऱ्या प्रयत्नात ७९.९ मीटर अंतरापर्यंत भाला फेकला. तिसऱ्या प्रयत्नात वैयक्तिक सर्वोच्च अंतराची नोंद करताना ८६.७७ मीटरपर्यंत भाला फेकला. चौथ्या प्रयत्नात किशोरने ८७.५४ मीटर अंतराची नोंद केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 04, 2023 7:11 PM IST