मॅथ्यू रेनशॉची संघात जोरदार एन्ट्री
ऑस्ट्रेलियाचा युवा बॅट्समन मॅथ्यू रेनशॉने संघात जोरदार एन्ट्री केली आहे, तर अनुभवी वेगवान बॉलर मिचेल स्टार्कसह काही मोठे खेळाडू टीममध्ये परतले आहेत. रेनशॉचा समावेश हा 2027 वन-डे वर्ल्ड कपच्या तयारीचा एक भाग आहे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाची मिडल ऑर्डर मजबूत होईल, असं तज्ज्ञांचं मत आहे. मॅथ्यू रेनशॉ याने बिग बॅशमध्ये कहर केला होता. अशातच आता टीम इंडियाविरुद्ध भिडणार आहे.
advertisement
मिचेल मार्शकडे कॅप्टन्सी
मॅथ्यू रेनशॉ हा स्टीव स्मिथ आणि लाबुशेनप्रमाणे इनिंग्ज सावरण्याची क्षमता ठेवतो, तर मिचेल स्टार्कच्या पुनरागमनाने बॉलिंग अटॅक अधिक धारदार झाला आहे. या मालिकेसाठी मिचेल मार्शकडे ऑस्ट्रेलियाच्या वन-डे आणि T20 टीमचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. संघात मिचेल ओवेन या स्फोटक बॅट्समनचाही समावेश आहे, जो ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टोइनिसप्रमाणे फिनिशरची भूमिका बजावू शकतो.
रोहित आणि विराटवर लक्ष
दुसरीकडे, दुखापतीतून सावरत असलेल्या पॅट कमिन्सला आणि आरोन हार्डी यांसारख्या खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेला हा संघ भारत दौऱ्यावर एक ब्लॉकबस्टर क्रिकेट सीरिज होण्याची चिन्हे दर्शवत आहे. अशातच आता टीम इंडियाचं लक्ष देखील रोहित आणि विराट यांच्यावर असणार आहे.
टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा वनडे स्कॉड - मिचेल मार्श (कर्णधार), जेवियर बार्टलेट, एलेक्स कैरी, कूपर कोनोली, बेन ड्वार्शिस, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, ट्रैविस हेड, जोश इंगलिस, मिचेल ओवेन, मॅथ्यू रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क, ॲडम जम्पा.
टी-ट्वेंटीसाठी ऑस्ट्रेलियाचा स्कॉड - मिचेल मार्श (कर्णधार), सीन एबॉट, जेवियर बार्टलेट, टिम डेविड, बेन ड्वार्शिस, नाथन एलिस, जोश हेजलवुड, ट्रैविस हेड, जोश इंगलिस, मॅथ्यू कुहनेमन, मिचेल ओवेन, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, ॲडम जम्पा.