ऑस्ट्रेलियाचे 3 ओव्हरमध्ये 88 रन्स
हॉन्ग कॉन्ग सिक्सेस टूर्नामेंटच्या पहिल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने 88 रन्सचे लक्ष्य केवळ 3 ओव्हरमध्ये आणि विकेट्स न गमावता पार केले. ऑस्ट्रेलियाच्या जॅक वुडने 11 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 3 फोर मारत 55 रन्सची खेळी केली. या दरम्यान, त्याने 500 च्या स्ट्राइक रेटने रन्स केले. निक हॉब्सनने 5 बॉलमध्ये 2 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने नाबाद 26 रन्सची खेळी केली. यापूर्वी, यूएईला या मॅचमध्ये मोठा स्कोर उभारता आला नाही.
advertisement
यूएईचे 6 ओव्हरमध्ये 87 रन्स
आधी बॅटिंग करताना यूएईची टीम 6 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून केवळ 87 रन्सच करू शकली. सगीर खानने 6 बॉलमध्ये 4 सिक्स मारत 24 रन्स केले. मुहम्मद अरफानने 14 बॉलमध्ये 3 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने नाबाद 28 रन्सची खेळी केली. कर्णधार खालिद शाहने 5 बॉलमध्ये 1 फोर आणि 1 सिक्स मारत 11 रन्स केले, तर जाहीद अलीने 5 बॉलमध्ये 1 फोर आणि 2 सिक्स मारत नाबाद 17 रन्सची खेळी केली.
पाहा Video
जॅक वुडला प्लेयर ऑफ मॅच
दरम्यान, ऑस्ट्रेलियाकडून क्रिस ग्रीनने एका ओव्हरमध्ये 19 रन्स देऊन 2 विकेट्स घेतल्या, तर जॅक वुडने 2 ओव्हरमध्ये 13 रन्स देऊन 1 विकेट मिळवली. त्याच्या या शानदार कामगिरीबद्दल जॅक वुडला प्लेयर ऑफ मॅच (Player of Match) म्हणून निवडलं गेलं.
