कोहली आणि अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहोचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रेमानंद महाराजांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे ज्यामध्ये कोहली आणि अनुष्का त्यांची दोन मुले वामिका आणि अकाय यांच्यासोबत प्रेमानंद महाराजांना भेटायला आले आहेत. यावेळी प्रेमानंद महाराज अनुष्का आणि विराटला मार्गदर्शन करत आहेत.
advertisement
अनुष्का आणि विराटने मुलांसह प्रेमानंद महाराजांची भेट घेतली. कोहली आणि अनुष्का याआधीही प्रेमानंद महाराजांची भेट घेतली आहे. यावेळी ते मुलांसह वृंदावनला पोहोचले आहे. कोहली आणि अनुष्का प्रेमानंद महाराजांसमोर पोहोचताच त्यांनी मस्तक टेकवून प्रेमानंद महाराजांना नमस्कार केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. कोहली प्रेमानंद महाराजांसमोर पोहोचताच त्यांनी त्याला विचारले, “तू खुश आहेस का?” यावर कोहलीने मान हलवत होकार दिला आणि हसला.
यादरम्यान अनुष्काने प्रेमानंद महाराजांना सांगितले की, “जेव्हा ती मागच्या वेळी त्यांना भेटण्यासाठी आली होती तेव्हा तिला काही प्रश्न विचारायचे होते, पण तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने असेच काही प्रश्न विचारले होते जे तिला विचारायचे होते.” अनुष्का प्रेमानंद महाराजांना म्हणाली, “तुम्ही मला फक्त प्रेम भक्ती द्या.” यावर प्रेमानंद महाराज म्हणाले, “तुम्ही खूप शूर आहात कारण हा सांसारिक मान मिळाल्यावर भक्तीकडे वळणे कठीण आहे. विराटवर भक्तीचा विशेष प्रभाव पडेल असे आम्हाला वाटते.” यावर अनुष्का म्हणाली, “भक्तीपेक्षा वरचे आमच्यासाठी काहीही नाही.” तेव्हा प्रेमानंद महाराज हसले आणि म्हणाले, “हो, भक्तीपेक्षा वरचे काही नाही. देवावर विश्वास ठेवा, त्याचे नामस्मरण करा आणि खूप प्रेम आणि आनंदाने जगा.”
“तुझ्या खेळात सरावाची कोणतीही कमतरता नव्हती, पण काही वेळा अपयशाला आपले प्रारब्ध जबाबदार असते.” अशा शब्दात प्रेमानंद महाराजांनी विराट कोहलीची समजूत काढत, त्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब प्रदर्शनाचा अप्रत्यक्ष उल्लेख यावेळी केला.