Duleep Trophy 2025 : दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील क्वार्टर फायनल सामन्यात लखनऊ सूपर जाएट्सच्या आयुष बदोनीने खतरनाक खेळी केली आहे. आयुष बदोनीने डबल सेंच्युरी मारली आहे. त्याच्या या सेंच्युरीमुळे सामना ड्रॉ ठरला. पण हा सामना ड्रॉ होऊन देखील नॉर्थ झोनने सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.त्यामुळे हे कसं शक्य झालं आहे. हे जाणून घेऊयात.
advertisement
खरं तर नॉर्थ झोनने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 4 विकेट गमावून 658 धावा केल्या होत्या आणि 833 धावांची भक्कम आघाडी घेऊन डाव घोषित केला होता. या धावा करण्यात आयुष बदोनीने मोलाची भूमिका बजावली होती.आयुष बदोनीने 223 बॉलमध्ये 204 धावांची नाबाद खेळी केली होती. या खेळीत त्याने 3चौकार आणि 13 चौकार लगावले होते. आयुष सोबत कर्णधार अंकित कुमारने 198 धावांची खेळी होती. आणि यश धुलने 133 धावांची शतकीय खेळी केली होती. यावेळी बदोनीने डबल सेंच्यूरी ठोकताच डाव घोषित करण्यात आला होता. शेवटच्या दिवशी निकाल लागणे शक्य नव्हतं.त्यामुळे हा सामना ड्रॉ घोषित करण्यात आला होता.
पहिल्या डावात घेतलेल्या भक्कम आघाडीच्या बळावर नॉर्थ झोनने स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे. त्यामुळे नॉर्थ झोन दुलीप ट्रॉफी 2025 स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे.आता सेमी फायनलमध्ये त्यांचा सामना साऊथ झोनविरूद्ध होणार आहे.
दरम्यान ईस्ट झोनचा पहिला डाव 230 धावांवर ऑल आऊट झाला होता. ईस्ट झोनकडून फक्त विराट सिंहने 69 धावांची खेळी केली होती.या खेळाडू व्यतिरीक्त इतर कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नव्हती. नॉर्थ झोनकडून अकीब नबीने एकट्याने 5 विकेट घेतल्या होत्या. हर्षित राणाने 2 आणि अर्शदिप सिंह, मयंक डागर आणि निशांत संधूने प्रत्येकी एक विकेट घेतली होती.
तर नॉर्थ झोनने पहिल्या डावात 405 धावा ठोकल्या होत्या.त्यात ईस्ट झोन 230 वरच ऑल आऊट झाल्याने नॉर्थ झोननेकडे दुसऱ्या डावात मोठी आघाडी मिळाती होती. दरम्यान पहिल्या डावात नॉर्थ झोनकडून कन्हैया वाधवानकडून 76 धावांची तर आयुष बदोनीने 63 धावांची खेळी केली होती.पण दुसऱ्या डावात बदोनीने ठोकलेल्या डबल सेंच्यूरीने मॅच फिरली होती.