जगातील सर्वोत्तम लीग म्हणून आयपीएलकडे पाहिजे जाते. कारण या लीगमध्ये जगभरातील खेळाडू खेळताना दिसतात. या लीगमध्ये अनेक तरूण खेळाडू कमी वयात खेळताना दिसतात.यंदाच्या हंगामावर नजर टाकली तर वैभव सुर्यवंशी 14 वर्षांच्या वयात आयपीएलमध्ये खेळताना दिसला होता. पण आता बीबीसीआयने एक नवीन नियम काढला आहे.या नियमाने क्रिकेट वर्तुळात खळबळ माजली आहे.त्यामुळे हा नियम काय आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
बीसीसीआय आयपीएलबाबत नवीन नियम लागू करत आहे. या नवीन नियमामुळे तरुण भारतीय खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यात अडचणी येणार आहेत.यामुळे आयपीएलमध्ये खेळण्याचे स्वप्नही भंगण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयने 16 वर्षांखालील खेळाडूंसाठी नवीन नियम लागू केला आहे. आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी 16 वर्षांखालील खेळाडूंना आता किमान एक प्रथम श्रेणी सामना खेळावा लागणार आहे.16 वर्षांखालील खेळाडूंसाठी हा नियम अनिवार्य आहे. जो खेळाडू ही आवश्यकता पूर्ण करण्यात अयशस्वी ठरेल त्याला आयपीएलमध्ये खेळण्यास मनाई केली जाईल.त्यामुळे खेळाडूंना मोठा झटका बसणार आहे.
वैभव सूर्यवंशी आयपीएलमधून बाहेर होणार?
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा 14 वर्षांचा फलंदाज वैभव सूर्यवंशी सारखे खेळाडू खूप लहान वयात आयपीएलमध्ये खेळले आहेत.तथापि, आयपीएलमध्ये पदार्पणापूर्वी वैभव सूर्यवंशीने प्रथम श्रेणी सामना खेळला होता. त्यामुळे, जरी हा नियम लागू केला असता तरी त्याचा वैभव सूर्यवंशीवर कोणताही परिणाम झाला नसता.
पण आता आयपीएल 2026 सुरू होण्यापूर्वी जर भारतीय क्रिकेटमधील 16 वर्षांचा खेळाडू ज्याने प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले नाही त्याची आयपीएलसाठी निवड झाली, तर त्या खेळाडूला आयपीएलमध्ये खेळण्याची आवश्यकता राहणार नाही.
नियम कधी लागू होणार?
16 वर्षांखालील खेळाडूंबाबत बीसीसीआयने लागू केलेले नियम आयपीएल 2026 पासून लागू होतील.जर आयपीएल स्काउट्सना एखादा तरुण खेळाडू आढळला तर त्यांना प्रथम प्रथम श्रेणी सामना खेळावा लागेल.त्यानंतरच तो खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यास पात्र ठरेल.