गेल्या 4 जून रोजी बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीसाठी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला जबाबदार धरले आहे. पोलिसांच्या परवानगीशिवाय संघाने अचानक सोशल मीडियावर विजयी मिरवणूक काढण्याची घोषणा केली होती, ज्यामुळे लाखो लोकांची गर्दी झाली होती.
त्यामुळे प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट होते की, जवळ जवळ तीन ते पाच लाखाचा जमाव एकत्र येण्यामागे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू जबाबदार आहे.आरसीबीने पोलिसांकडे परवानगी घेतली नाही. अचानक सोशल मीडियावर घोषणा करून टाकली आणि लोक एकत्र जमली होती. आरसीबीने अचानक केलेल्या कार्यक्रमाच्या घोषणेस 'अराजकता निर्माण करणे' असे लवादाने म्हटले आहे.
advertisement
आदेशात म्हटले आहे की,'आरसीबीने कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय अचानक या प्रकारचा गोंधळ निर्माण केला. फक्त १२ तासांत पोलिस कायदा किंवा इतर नियमांनुसार सर्व आवश्यक व्यवस्था करू शकतील अशी अपेक्षा करता येत नाही.पोलीस देखील माणसे आहेत. ते 'देव' किंवा 'जादूगार' नाहीत आणि त्यांच्याकडे 'अलादीनच्या दिव्यासारखे' कोणतेही जादूई उपकरण नाही ज्याद्वारे ते फक्त बोटे हलवून कोणतीही इच्छा पूर्ण करू शकतात.
दरम्यान अशा गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आवश्यक व्यवस्था करण्यासाठी पोलिसांना पुरेसा वेळ आणि आगाऊ माहिती द्यायला हवी होती, असा निष्कर्ष न्यायाधिकरणाने काढला, जो या प्रकरणात देण्यात आला नाही.
आरसीबी व्यवस्थापन या घटनेवर भाष्य करण्यासाठी उपलब्ध नव्हते. यापूर्वी, या घटनेसंदर्भात आरसीबी आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनवर आरोप लावण्यात आले होते, ज्यामुळे केएससीएचे सचिव ए. शंकर आणि कोषाध्यक्ष जयराम यांनी राजीनामा दिला होता.