शिवराजने पंचांना गोळ्या घालायला पाहिजे होत्या, असे धक्कादायक वक्तव्य डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केले आहे. २००९ साली मी देखील अशाच वादग्रस्त निर्णयाला बळी पडलो, असे देखील ते म्हणाले. या संपूर्ण प्रकणात पृथ्वीराजची चूक नाही, तर पंचांचा निर्णय चुकीचा आहे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील राडा: चंद्रहार पाटलांनी थेट कुस्तीचा नियमच सांगितला
advertisement
खर तर काल जो प्रकार घडला तो खरोखर चुकीचा होता. म्हणून सर्व माध्यमांच्या मार्फत सांगितले की, शिवराजने जो काही प्रकार केला तो चुकीचा केला. पण मी जेव्हा चुकी प्रकार म्हटले, तेव्हा मला असं म्हणायचे होते की पंचाला शिक्षा मिळत असताना थोडी शिक्षा मिळाली. शिवराजवर जो अन्याय झाला. त्यासाठी त्याने असल्या पंचांना गोळ्या घालायला पाहिजे होत्या, असे माझे स्पष्ट मत आहे. कारण हाच प्रकार २००९ साली माझ्यासोबत झाला होता. शिवराज आता तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होता. तेव्हा मी पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होतो. पण पंचांच्या निर्णयामुळे सहा मिनिटांची कुस्ती दीड तास चालवल्यामुळे मी जो अन्याय सहन केला, तोच अन्याय शिवराज सहन करतोय.
पॉर्न स्टारला 25व्या वर्षी आला Heart Attack; उपचार घेत असताना घडले भयंकर
काल काय म्हणाले होते?
काल रविवारी ही घटना घडली तेव्हा चंद्रहार पाटील यांनी संयमी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत असा प्रकार कधीच झाला नाही. मात्र तो का झाला याचा देखील विचार केला पाहिजे. पंचांना निकाल देण्याची घाई करण्याची गरज नव्हती. राक्षेला आक्षेप नोंदवण्याची संधी दिली गेली नाही . गोष्टी क्लिअर करून निकाल दिला पाहिजे होता. व्हिडिओ पाहून दोन्ही खेळाडूंना गोष्टी समजावून मग निकाल दिला पाहिजे होता, असे चंद्रहार पाटील म्हणाले होते.
