महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील राड्यावर चंद्रहार पाटील यांची मोठी प्रतिक्रिया; थेट कुस्तीचा नियमच सांगितला
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Maharahstra Kesari Controversy: दिवंगत बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरीत महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर संघ आणि अहिल्यानगर कुस्तीगिर संघाच्या सुंयक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या ६७ वी अजिंक्य कुस्ती स्पर्धेचे अंतिम तीन सामना संपन्न होण्याआधीच पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यातील सामन्यादरम्यान तुफान राडा झाला.
अहिल्यानगर: संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही मोठ्या राड्यामुळे चर्चेत आली. उपांत्य फेरीत बाद झाल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने पंचांची कॉलर धरली आणि त्यानंतर त्यांना लाथ मारली.पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात खेळवला गेला. सामना अतिटतीचा सुरू होता. तेव्हा मोहोळच्या एका डावात राक्षे पाठीवर आला अन् पंचांनी राक्षेला बाद घोषित केलं. पंचांनी पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित केलं. त्यामुळे राक्षेला राग आला.
या घटनेवर आजी-माजी कुस्तीपटू आणि पंचांकडून प्रतिक्रिया येत आहेत. डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. असा प्रकार कधीच झाला नाही. पण तो का झाला याचा देखील विचार केला पाहिजे. निकाल देण्याची घाई करण्याची गरज नव्हती. राक्षेला आक्षेप नोंदवण्याची संधीच मिळाली नाही. गोष्टी क्लिअर करून निकाल दिला पाहिजे होता. व्हिडिओ पाहून दोन्ही खेळाडूंना गोष्टी समजावून मग निकाल दिला पाहिजे होता, असे चंद्रहार पाटील यांनी सांगितले.
advertisement
कोण आहे गोंगाडी त्रिशा? वडिलांनी 2 वर्षांच्या मुलीला प्लास्टिक बॅट दिली अन्..
कुस्तीतील नियमानुसार दोन्ही खांदे टेकले पाहिजे. व्हिडिओत तरी एकच खांदा टेकला आहे. ही घटना कशामुळे झाले हे कळत नाही. पंचांच्या घाईमुळे असा प्रकार झाला असावा असे चंद्रहार पाटील म्हणाले.
advertisement
काय म्हणाला शिवराज राक्षे
या सर्व प्रकारानंतर माध्यमांशी बोलताना शिवराज राक्षे म्हणाला, माझे दोन्ही खांदे टेकले असतील तर मी हार मानायला तयार आहे. तुम्ही टीव्ही रिप्ले बघा. माझ्यावर अन्याय झाला आहे. पंच त्यांना मिळाले आहेत. पुन्हा कुस्ती लढवा.
अर्ध्या तासात आक्षेप करता येतो. पण पंचांनी तो नाकारला गेला. पंचांनी चुकीचा निर्णय दिला. त्यामुळे ही घटना घडली, अशी प्रतिक्रिया कुस्तीपटू बाळू बोकडे यांनी दिली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 02, 2025 8:37 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील राड्यावर चंद्रहार पाटील यांची मोठी प्रतिक्रिया; थेट कुस्तीचा नियमच सांगितला


