कोण आहे विश्वविजेती गोंगाडी त्रिशा? वडिलांनी २ वर्षांच्या मुलीला प्लास्टिक बॅट दिली अन् भारताला मिळाला नवा स्टार

Last Updated:

Gongadi Trisha: मलेशियात झालेल्या आयसीसी 19 वर्षाखालील महिलांच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेचा परभव करून विजेतेपद मिळवले. या स्पर्धेत भारताच्या त्रिशाला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार मिळलाा. जाणून घ्या टीम इंडियाच्या नव्या स्टारबद्दल...

News18
News18
मुंबई: आज भारत आणि इंग्लंड यांच्यात मुंबईतील वानखेडे मैदानावर टी-20 मॅच होणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-1 अशी आघाडी घेतली असली तरी या सामन्याकडे सर्वांचे लक्ष असेल. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळले आणि मग 19 तारखेपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळले. सर्व चाहत्यांचे लक्ष पुरुष संघाच्या लढतीकडे असेल तरी तिकडे मलेशियात झालेल्या आयसीसी 19 वर्षाखालील महिलांच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताच्या मुलींनी कमाल केली. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकला. स्पर्धेचा हा दुसरा हंगाम असून भारत हा एकमेव विजेता आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजीत राहिला. संघातील सर्वच खेळाडूंनी कमाल केली. मात्र एक खेळाडू अशी होती जिला अंतिम सामन्यात सामनावीर आणि मालिकावीर असा पुरस्कार मिळाला.
19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघाला एक नवा चेहरा मिळाला आहे. हे नाव म्हणजे त्रिशा गोंगडी होय. त्रिशाने संपूर्ण स्पर्धेत 4,27,49,40, नाबाद 110, 35, नाबाद 44 अशा 309 धावा केल्या. तिचा स्ट्राइक रेड 147 तर सरासरी 77ची आहे. तर गोलंदाजीत 7 विकेट घेतल्या.
भारताच्या मुलींची ऐतिहासिक कामगिरी, सलग दुसऱ्यांदा जिंकला ICC टी-20 वर्ल्डकप
तेलंगणातील भद्रचलम येथे 15 डिसेंबर 2005 साली जन्मलेल्या त्रिशाला क्रिकेटचे धडे वयाच्या दुसऱ्या वर्षापासून मिळाले. माजी हॉकीपटू असलेले त्रिशाचे वडील जी. रामी रेड्डी हे सध्या फिटनेस ट्रेनर आहेत. रेड्डी यांनी त्रिशाला वयाच्या दुसऱ्या वर्षी एक प्लास्टिकची बॅट भेट दिली. त्रिशा त्या बॅटने शॉट्स खेळायची. त्रिशाला क्रिकेटमध्ये प्रोत्साहन देण्याचा रेड्डी यांनी ठरवले आणि भद्राचलम येथून कुटुंब सिंकदराबादला हलवले. वयाच्या सातव्या वर्षी तिने सेंट जॉन क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण सुरू केले. ही देशातील प्रसिद्ध क्रिकेट अकादमी आहे. वयाच्या 8 व्या वर्षी ती अंडर-16 संघात खेळू लागली. 11व्या वर्षी तिने अंडर-19 आणि अंडर-23 संघांत खेळायला सुरुवात केली. 13व्या वर्षी तिला भारतीय क्रिकेट अकादमीच्या शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळाली.
advertisement
जेव्हा ती चार वर्षांची होती तेव्हा रेड्डी तिला आपल्या जिममध्ये घेऊन जायचे. सामान्यतः मुले 8 वर्षांनंतर क्रिकेट सुरू करतात, पण त्या वेळी स्पर्धा खूप मोठी असते. म्हणून मी तिला दोनव्या वर्षीपासून क्रिकेट शिकवायला सुरुवात केली, असे त्यांनी सांगितले. मुलीच्या क्रिकेट करिअरसाठी रेड्डींनी तिला शालेय शिक्षणापासूनही काही काळ दूर ठेवले आणि खासगी शिक्षणाची व्यवस्था केली. जेणेकरून ती क्रिकेटकडे पूर्ण लक्ष केंद्रित करू शकेल. तिला सुरुवातीला फक्त तीन तास शाळेत पाठवले जात असे, उर्वरित सहा ते आठ तास ती क्रिकेटचा सराव करत असे. सामान्य शालेय शिक्षण घेतले असते, तर तिला भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नसती, असे रेड्डी सांगतात.
advertisement
भारताच्या गोंगाडी त्रिशाने इतिहास घडवला, अशी कामगिरी करणारी पहिली क्रिकेटपटू
2021-22 मध्ये 19 वर्षाखालील क्रिकेट चॅलेंजर्ससाठी भारतीय अ संघात तिची निवड झाली. नंतर सिनिअर महिला चॅलेंजर ट्रॉफीत तिला स्थान मिळाले. आयसीसी महिला 19 वर्षाखालील टी-20 क्रिकेटच्या सुपर सिक्स फेरीत त्रिशाने ऐतिहासिक कामगिरी केली. स्कॉटलंडविरुद्ध खेळताना तिने 59 चेंडूत नाबाद 110 धावा केल्या. या स्पर्धेच्या इतिहासात शतक करणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
कोण आहे विश्वविजेती गोंगाडी त्रिशा? वडिलांनी २ वर्षांच्या मुलीला प्लास्टिक बॅट दिली अन् भारताला मिळाला नवा स्टार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement