India win ICC U19 T20 World Cup: भारताच्या मुलींची ऐतिहासिक कामगिरी, सलग दुसऱ्यांदा जिंकला ICC टी-20 वर्ल्डकप, फायनलमध्ये द.आफ्रिकेचा केला पराभव
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
India Women win ICC U19 T20 World Cup: मलेशियात झालेल्या आयसीसी 19 वर्षाखालील महिलांच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून सलग दुसरे विजेतेपद मिळवले.
नवी दिल्ली: भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा आयसीसी 19 वर्षाखालील महिला टी-20वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवले. मलेशियात झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने एकही मॅच गमावली नाही. भारतीय महिला संघाने याआधी 2023 साली झालेल्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद पटकावले होते. तेव्हा भारताने इंग्लंडचा पराभव केला होता.
फायनल मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारतीय गोलंदाजीसमोर त्यांचा डाव 20 षटकात गुंडाळला गेला. आफ्रिकेने 20 षटकात 10 बाद फक्त 82 धावा केल्या. भारताकडून गोंगाडी त्रिशाने सर्वाधिक 4 षटकात 15 धावा देत सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर वैष्णवी शर्मा, आयुषी शुक्ला, पारुनिका सिसोदिया यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. शबनम शकीलने एक विकेट घेतली.
advertisement
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड BCCIचे उत्पन्न किती? सरकारला किती Tax देतात
विजयासाठी 83 धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात दमदार झाली. मात्र 36 धावांवर संघाने पहिली विकेट गमावली. त्यानंतर गोंगाडी त्रिशा आणि सानिका चाळके यांनी संघाला सहज विजय मिळून दिला. भारताने ही लढत 9 विकेट आणि 52 चेंडू राखून जिंकली. भारताकडून त्रिशाने नाबाद 44 धावा केल्या तर सानिकाने नाबाद 26 धावांचे योगदान दिले.
advertisement
वर्ल्डकपमधील भारतीय संघाची कामगिरी
ग्रुप फेरी- वेस्ट इंडिजवर 9 विकेटनी विजय
ग्रुप फेरी- मलेशियावर 10 विकेटनी विजय
ग्रुप फेरी- श्रीलंकेवर 60 धावांनी विजय
सुपर सिक्स- बांगलादेशवर 8 विकेटनी विजय
सुपर सिक्स- स्कॉटलंडवर 150 धावांनी विजय
सेमीफायनल-इंग्लंडवर 9 विकेटनी विजय
advertisement
फायनल- दक्षिण आफ्रिकेवर 9 विकेटनी विजय
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 02, 2025 2:27 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
India win ICC U19 T20 World Cup: भारताच्या मुलींची ऐतिहासिक कामगिरी, सलग दुसऱ्यांदा जिंकला ICC टी-20 वर्ल्डकप, फायनलमध्ये द.आफ्रिकेचा केला पराभव


