Cricket News: मॅच न खेळता टीम इंडियाला मिळाली गुड न्यूज; कसोटी क्रिकेटमधील नकोसा डाग पुसला गेला
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
SL vs AUS: ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने विक्रमी विजय मिळवला.
कोलंबो: ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा एक डावाने पराभव करून इतिहास घडवला. या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणाऱ्या स्टीव्ह स्मिथने देशाला आशिया खंडातील सर्वात मोठा विजय मिळवून दिला. स्मिथने 7 वर्षानंतर ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व केले. गॉल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 1 डाव आणि 242 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयात भारतीय संघावरील एक मोठा डाग पुसला गेला.
ऑस्ट्रेलियाचा हा आशिया खंडातील सर्वात मोठा विजय आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा आशियातील सर्वात मोठा विजय भारताविरुद्ध होता. त्यांनी भारताचा घरच्या मैदानावर 226 धावांनी पराभव केला होता. मात्र आजच्या श्रीलंकेच्या पराभवामुळे भारतावरील हा डाग पुसला गेला आहे. कसोटी क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाचा हा चौथा सर्वात मोठा विजय ठरला.
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड BCCIचे उत्पन्न किती? सरकारला किती Tax देतात
सलामीवीर उस्मान ख्वाजाच्या 232 आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या 141 अन् जोस इंग्लिसच्या 102 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 654 धावांचा डोंगर उभा केला होता. उत्तरादाखल श्रीलंकेला पहिल्या डावात 165 धावा करता आल्या. 489 धावांनी पिछाडीवर पडलेल्या लंकेला फॉलोऑन दिला आणि दुसऱ्या डावात देखील त्यांना फक्त 247 धावा करता आल्या.
advertisement
कसोटी क्रिकेटमधील श्रीलंकेचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव आहे. याआधी श्रीलंकेचा भारताने सर्वात मोठा पराभव केला होता. टीम इंडियाने 2017 साली नागपूर कसोटीत त्यांचा एक डाव आणि 239 धावांनी पराभव केला होता.
ऑस्ट्रेलियाच्या कसोटी इतिहासातील 4 सर्वात मोठे विजय
2002 - दक्षिण आफ्रिकेविरुद्ध – डाव आणि 360 धावांनी विजय
advertisement
1946 - इंग्लंडविरुद्ध – डाव आणि 332 धावांनी विजय
1950 - दक्षिण आफ्रिकेविरुद्ध – डाव आणि 159 धावांनी विजय
2024 - श्रीलंकेविरुद्ध – डाव आणि 242 धावांनी विजय
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 01, 2025 7:28 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Cricket News: मॅच न खेळता टीम इंडियाला मिळाली गुड न्यूज; कसोटी क्रिकेटमधील नकोसा डाग पुसला गेला


