CSK ची 'फ्रॉड डील' आहे काय?
खरं तर, चेन्नईला गुरजपनीत सिंगची जागा घेण्यासाठी एका खेळाडूची गरज होती आणि गेल्या मोसमात त्याची जागा ब्रेविसने घेतली होती. अश्विनच्या म्हणण्यानुसार, अनेक संघ या युवा दक्षिण आफ्रिकन फलंदाजाला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक होते, पण सुपर किंग्जने जास्त पैसे देऊन त्याला विकत घेतले. त्यामुळे सोशल मीडियावर या कराराला 'फ्रॉड डील' (fraud deal) असंही म्हटलं गेलं.
advertisement
डेवाल्ड ब्रेविसची रिप्लेसमेंट नियमानुसार
चेन्नई सुपर किंग्जने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे अश्विनचे दावे खोटे असल्याचे म्हटले आहे. एक्स (X) वर पोस्ट करून सीएसके (CSK) संघाने लिहिले की, "डेवाल्ड ब्रेविसने आयपीएल प्लेयर नियमावली २०२५-२०२७ च्या क्लॉज ६.६ नुसार रिप्लेसमेंट प्लेयर (replacement player) म्हणून करार केला होता. ब्रेविसला नियमांनुसारच संघात घेतले आहे, हे फ्रेंचायजी स्पष्ट करू इच्छिते."
अश्विन नेमकं काय म्हटला होता?
डेवाल्ड ब्रेविससाठी आयपीएलचा दुसरा हाफ चांगला गेला होता. त्यामुळे दोन ते तीन संघ त्याला संघात घेण्यासाठी उत्सुक होते. पण त्यावेळी कोणताही संघ जास्त पैसे मोजायला तयार नव्हता. त्यावेळी सीएसकेने एन्ट्री केली आणि डेवाल्ड ब्रेविसला खरेदी केलं. जर मी आता संघात आलो आणि चांगली कामगिरी केली तर माझे मूल्य वाढेल. त्यामुळे मला त्या आधारावर पैसे मिळाले पाहिजेत, अशी डेवाल्ड ब्रेविसची मागणी होती, असं अश्विन म्हणाला होता.
चेन्नई सुपर किंग्जवर बॅन लागणार?
दरम्यान, डेवाल्ड ब्रेविसच्या रुपात चेन्नई सुपर किंग्जकडे ट्रम्प कार्ड आहेत, असं अश्विन म्हणाला. पण डेवाल्ड ब्रेविसला जास्त पैसे देऊन खरेदी केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता सोशल मीडियावर टीका होताना दिसतीये. एकीकडे अश्विनच्या वक्तव्यामुळे गोंधळ उडाला असताना आता चेन्नई सुपर किंग्जवर बॅन आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे.