रविचंद्रन अश्विनने सांगितले की अनेक टीम ब्रेव्हिसला त्यांच्या टीममध्ये समाविष्ट करू इच्छित होते. पण ब्रेव्हिसच्या एजंटशी अनेक चर्चा केल्यानंतर, सीएसकेने त्याला जास्त पैसे देऊन टीममध्ये समाविष्ट केले. अश्विनने असेही म्हटले की ब्रेव्हिससारख्या खेळाडूंना माहित आहे की त्यांना लिलावात मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे मिळतील, म्हणून त्याच्या इच्छेनुसार तो पैसे मागू शकतो.
advertisement
रविचंद्रन अश्विन म्हणाला, 'मी तुम्हाला ब्रेव्हिसबद्दल काही सांगतो. गेल्या आयपीएल हंगामात त्याने चेन्नई सुपर किंग्जसोबत खूप चांगला वेळ घालवला आणि अनेक टीम त्याच्यात रस दाखवत होत्या. जास्त किंमतीमुळे अनेक टीमनी त्याला समाविष्ट केले नाही. बदली म्हणून, त्याला मूळ किंमत मिळायला हवी होती, पण तुम्ही एजंट्सच्या संपर्कात येता आणि खेळाडू टीममध्ये येण्यासाठी जास्त पैशांची मागणी करतो'.
'असे घडते कारण खेळाडूला माहित असते की जर त्याला पुढच्या हंगामात सोडण्यात आले तर त्याला लिलावात खूप पैसे मिळतील. ब्रेव्हिसची संकल्पना अशी होती की एकतर त्याला जास्त पैसे मिळावेत, किंवा तो पुढच्या हंगामात लिलावात त्याचे नाव नोंदवेल. सीएसके अधिक पैसे देण्यास तयार असल्याने, तो संघात सामील झाला', असं अश्विनने सांगितलं आहे. पण अश्विनच्या या खुलाश्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
आयपीएलच्या नियमानुसार लिलावात विक्री न झालेल्या खेळाडूला त्याच्या बेस प्राईजवरच विकत घ्यायची परवानगी आहे, पण अश्विनने मात्र सीएसकेने डेवाल्ड ब्रेविसला 'अंडर द टेबल' जास्त पैसे दिल्याचा आरोप केला आहे, त्यामुळे आता बीसीसीआय यावर कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. डेवाल्ड ब्रेव्हिस गेल्या हंगामात फक्त 6 सामने खेळला, ज्यामध्ये त्याने 37.50 च्या सरासरीने 225 रन केल्या. त्याने 6 सामन्यांमध्ये 2 अर्धशतके देखील ठोकली.