वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये डेवॉन कॉनवेने पहिले द्विशतक केलं आणि त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये शतक ठोकून इतिहास घडवला. कॉनवे असा विक्रम करणारा न्यूझीलंडचा पहिलाच खेळाडू आहे. कॉनवेने पहिल्या इनिंगमध्ये 227 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 100 असे मिळून संपूर्ण सामन्यात एकूण 327 रन केल्या. कॉनवे एका टेस्टमध्ये सर्वाधिक रन करणारा न्यूझीलंडचा तिसरा खेळाडू बनला.
advertisement
वेस्ट इंडिजला 462 रनचं आव्हान
सामन्यात पहिले बॅटिंग करताना कॉनवेचं द्विशतक आणि कर्णधार टॉम लेथमच्या शतकामुळे न्यूझीलंडने 578/8 वर इनिंग घोषित केली. लेथमने पहिल्या इनिंगमध्ये 137 रनची खेळी केली होती, तर रचिन रवींद्रने 72 रन केले. केन विलियमसनने 31, एजाज पटेलने 30 आणि ग्लेन फिलिप्सने 29 रनची खेळी केली.
वेस्ट इंडिजने पहिल्या इनिंगमध्ये 420 रन केले. केवम हॉद 123 रनवर नाबाद राहिला, तर ब्रेंडन किंगने 63, एलिक एथनाजे आणि जॉन कॅम्पबेलने 45-45 रन केले. जस्टीन ग्रीव्हसने 43 रनची खेळी केली. न्यूझीलंडकडून जेकब डफीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, याशिवाय एजाज पटेलला 3, मायकल रे ला 2 आणि डॅरेल मिचेलला 1 विकेट मिळाली.
पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंडला 158 रनची आघाडी मिळाली, त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये न्यूझीलंडने त्यांचा डाव 306/2 वर घोषित केला. पहिल्या इनिंगमध्ये शतक करणाऱ्या टॉम लेथमने दुसऱ्या इनिंगमध्येही शतक ठोकलं. तर केन विलियमसन 40 आणि रचिन रवींद्र 46 रनवर नाबाद राहिले. वेस्ट इंडिजला विजयासाठी 462 रनचं आव्हान मिळालं, याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसाअखेरीस वेस्ट इंडिजचा स्कोअर 43/0 एवढा झाला आहे. ब्रेंडन किंग 37 रनवर आणि जॉन कॅम्पबेल 2 रनवर खेळत आहेत.
